शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ऊस जाळण्याच्या सत्राने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:48 IST

तळोदा तालुका : शेतक:यांचे नुकसान, प्रशासनाने दखल घ्यावी

बोरद : तळोदा तालुक्यातील पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऊस जाळण्याचे सत्र सुरु आह़े यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत़ गेल्या दोन आठवडय़ात ऊस जाळण्याच्या चार ते पाच घटना आतार्पयत झालेल्या आहेत़ त्यामुळे शेतक:यांच्या तोंडाचे पाणी पळाले असल्याचे दिसून येत आह़े शुक्रवारी सायंकाळी मोहिदा येथील ऊस उत्पादक शेतकरी शरद खंडू चव्हाण व त्यांची पत्नी शिलाबाई चव्हाण याच्या उमरी शिवारातील 91/1 व 91/2 या शिवारात एकूण साडेसात एकरावर उसाचे पिक घेण्यात आले आह़े त्यातील साधारणत:  3 एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े उमरी आणि मोहिदा येथील शेतकरी तसेच युवकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल़े परंतु आग सर्वत्र पसरली असल्याने तीला आटोक्यात आणणे शक्य झाले नाही़ ही आग हेतूपुरस्कर कोणीतरी लावली असल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांकडून करण्यात येत आह़े याच शिवारामध्ये या आधीही उसाच्या क्षेत्राला आग लागल्याची घटना घडली आह़े त्यामुळे साहजिकच ही आगदेखील विघ्नसंतोषी वृत्तीच्या लोकांकडूनच लावण्यात आली असल्याचे म्हटले जात आह़े दुसरीकडे 11 ऑक्टोबर रोजी तळोदा ते बोरद रस्त्यावरील कढेल शिवारातील रामदास फकीरा शिंदे यांच्या शेतातून शेती उपयोगी साहित्येही चोरीला गेल्याची घटना ताजी आह़े याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली होती़ एकीकडे उसाला आग लावण्याच्या घटना तर दुसरीकडे अशा प्रकारे शेती उपयोगी साहित्यांची चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत़ यामुळे शेतक:यांचे निव्वळ नुकसान होत आह़े त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत         आह़े कापूसही जातोय चोरीलासध्या शेतशिवारात कापूस वेचनीची कामे जोमात सुरु आहेत़ कापूस वेचून तो एका ठिकाणी गोळा करण्यात येत आह़े परंतु रात्री कापसाची चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस येत आह़े त्यामुळे कापूस उत्पादक शेतक:यांना रात्रीदेखील खडा पहारा ठेवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े दिवसभर शेतात राबून घामाने उगवलेले पिकही चोरीला जात असल्याने शेतकरी हतबल झाला आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत तातडीने उपाय योजना राबवाव्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत़