शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

शेती परवडत नसल्याने उक्ते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली ...

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली तरी निसर्गाच्या तडाख्यामुळे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे भांडवली खर्च शेतीत परवडत नाहीये. म्हणून परिसरातील अनेक शेतकरी आपली जमीन उक्ते देण्याकडे देताना दिसून येत आहेत.

दोन वर्षांपासून पावसाळा समाधानकारक होत असला तरी एका मागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी बेजार झाला असून, आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी आवाक्याबाहेर लागत असलेल्या भांडवली खर्चामुळे आपली शेती उक्ते देताना दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते चार एकरपर्यंत शेती आहे, असे शेतकरी मोठे बागायतदार शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ हजारांपर्यंत नफ्याने जमीन कसायला देत आहेत.

गेल्या १५ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट जाता जात नाहीये. त्यात निसर्गाने अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यासारखे संकट निर्माण केल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांचे शेतीसाठी लावलेले भांडवलही निघत नाही. त्यामुळे जे शेतकरी उधार - उसनवारीने पैसे घेऊन आपल्या शेतीत भांडवल लावत असतात ते दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी होत आहेत.

नैसर्गिक आपत्तीसह शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

कोरोना महामारीमुळे अनेकदा बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी व्यापारीही माल घेण्यासाठी फिरकत नाही. जे मोजके व्यापारी येतात ते परिस्थितीचा फायदा उचलून मनमानी भावाने शेतकऱ्यांचा माल मागत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी शेती करणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रासायनिक खते, बी - बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे वाढलेली मजुरी, सतत उद्भवणारी बोंडअळी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, जमीन मशागतीचे वाढलेले दर, उत्पन्नात झालेली घट यासारख्या असंख्य समस्यांना सध्या शेतकरी तोंड देत आहे. त्यामुळे हताश होऊन अनेक सामान्य शेतकरी आपली जमीन मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना एक - दोन वर्षाच्या बोलीवर नफ्याने कसण्यासाठी देत आहेत. पूर्वी जे नोकरदार शेतकरी बाहेरगावी नोकरीस होते. तेच आपली जमीन उक्ते देत होते. मात्र आता वर्षानुवर्षे शेती करणारा सधन शेतकरीही शेतीमध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी तसेच भांडवली खर्च परवडत नसल्यामुळे आपली जमीन निम्मे बटाई किंवा उक्ते देत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात सगळ्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही.

कोरोना या संसर्गजन्य आजारापासून लोकांचा बचाव व्हावा, म्हणून शासनाने अनेकदा कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू केली. याचा फायदा सर्व व्यापारी तसेच अनेक धंदेवाईकांना झाला. संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीयोग्य वस्तू यामध्ये बी-बियाणे, रासायनिक खते, अवजारे या सारख्या गोष्टींचे भाव वाढतच आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत घेऊन जायचा असेल तर कोरोनाच्या नावाखाली वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना काळात घर बांधण्यासाठी लागणारे विटा, सिमेंट, लोखंड, कारागीर यांचे दर वाढले. हार्डवेअरचे वस्तू, नवी मोटारसायकल अशा अनेक गोष्टी असतील की, त्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्याचे नशीब असे आहे की, आयुष्यभर राबराब राबून दुसऱ्याच्या तोंडात अन्नाचा घास भरविणारा आज चोहोबाजूंनी संकटात सापडलेला आहे. आणि त्याच्याच मालाला भाव भेटत नाहीये. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, कर्जबाजारीपणामुळे हताश होऊन शेती करणे नकोशी वाटत असल्याने जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला निम्मे बटाई अथवा उक्ते देणे पसंत करीत आहे.