शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गणकीय सातबाऱ्यातील चुकांमुळे शहाद्यात शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:18 IST

शहादा तालुका : तलाठी व मंडळ अधिकाºयांकडे दुरुस्तीसाठी हेलपाटेसं

शहादा : तालुक्यातील अनेक शेतकºयांचा संगणकीय सातबारा उताराच्या भोगवटा रकाना कोरा निघत असल्याने त्यातील दुरुस्तीकरिता शेतकºयांना तलाठी व मंडळ अधिकाºयांकडे हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीचा निधी व शासनाच्या विविध योजनांचे अनुदान खात्यावर जमा होण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे.शेतकºयांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार मनोज खैरनार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांकडे सातबारा उतारा हा अनिवार्य आहे. गेल्या काही महिन्यापासून शेतकºयांना संगणकीय सातबारा उतारा मिळत आहे. सातबारा उतारा घेताना त्यावर अनेकांच्या नोंदी नाहीत तर काहींच्या नोंदीत चुका झालेल्या आहेत. तसेच शेतकºयांच्या शेतीचे क्षेत्रफळ किती आहे तेदेखील कमी-जास्त झालेलं दिसून येते. सातबाºयातील एक भाग म्हणजे भोगवटा या चौकटीत शेतकºयांच्या नावे असलेल्या जमिनीची नोंद नाही, जमिनीची व कुटुंबाची फोड झाली असेल तर त्याही नोंदी आढळून येत नाही. यासह अनेक दुरुस्त्या सातबाºयावर आढळून येत आहे. शेतकºयाचे नाव आहे परंतु त्याची शेत जमीन किती क्षेत्रफळ किती त्याची विभागणी आदी नोंद दिसून येत नाही. या नोंदी नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोंड आळीचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच केंद्र शासनाने दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकºयांसाठी निधी जमा करण्याचे नियोजन केलेले आहे. सातबारा उतारा निघाल्यानंतर त्याची तपासणी केली असता उताºयावर तालुक्यातील पाडळदा, कलसाडी, चिखली, कानडी, बुपकरी डामरखेडा, भागापुर, गोगापुर, डोंगरगाव, असलोद, मंदाणे यासह अनेक गावातल्या शेतकºयांच्या संगणकीय सातबारा उताºयावर नोंदी नाही किंवा चुकीची आढळून येत असल्याचे बोलले जात आहे. यातील दुरुस्तीकरिता शेतकºयांना तलाठी व सर्कल यांच्याकडे अर्ज घेऊन फेरफटका मारावा लागत आहे. अगोदरच शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन नसल्याने हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी तलाठी व सर्कल यांच्याकडे अर्ज घेऊन एक-दोन नव्हे तर आठवडाभर चकरा मारत आहे. आर्थिक वमानसिक स्थितीत अडकलेल्या शेतकºयांचा संगणकीय उताºयाबाबत महसूल विभागाचे उपविभागीय प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सातारकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी सातबारा उतारातील येत असलेल्या चुकीची दुरुस्ती करिता सर्कल व तलाठी यांना तातडीने दुरूस्त्या करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी होत आहे.