शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पीके करपतांना पाहून शेतक:यांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:01 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय नंदुरबार तालुक्यातील पळाशी परिसरात शेतक:यांच्या शेतावर फेरफटका मारल्यावर दिसून येतो. या परिसरातील जवळपास 15 किलोमिटरच्या भागात जमिनीतील पाणीच आटल्याने बागायती पीके करपू लागली आहे. लाखो रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असतांना उत्पन्न तर गेलेच पण झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतक:यांची अक्षरश: झोप उडाली आहे. या वर्षीचा दुष्काळ अतिशय भयानक असेल याची चाहूल सुरू झाली आहे. पाऊसच नसल्याने या वर्षी जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल खोल जात आहे. त्यामुळे एरव्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यार्पयत सुस्थितीत चालणा:या विहिरी आतापासूनच कोरडय़ा झाल्या आहेत. परिणामी या पाण्यावर अवलंबून पिकांचे नियोजन करणा:या हजारो शेतक:यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्याचा भरोवशावर कापूस आणि मिरचीचे पीक घेतात. यंदा देखील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रात असेच पिकांचे नियोजन शेतक:यांनी केले आहे. मात्र त्यांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. या परिस्थितीचा पहाणीसाठी पळाशी, ता.नंदुरबार परिसरात भेट दिली असता तेथील शेतक:यांच्या प्रतिक्रिया हृदय पिळवटणा:या आहेत. या भागात गेल्या चार वर्षापासून पाऊस झालेला नाही. एरव्ही मार्च, एप्रिलर्पयत चालणा:या विहिरी गेल्या दोन वर्षापासून डिसेंबर जानेवारीर्पयत चांगल्या स्थितीत असतात. या उपलब्ध पाण्याचा आधारावर यावर्षीही शेतक:यांनी कापूस आणि मिरची लागवड केली. पण जुलैच्या मध्यापासून पाऊसच न झाल्याने विहिरी महिनाभरापूर्वीच कोरडय़ा झाल्या आहेत. पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने सप्टेंबर महिन्यात ऐन फुलो:यात आलेले कपाशी आणि मिरचीचे पीक सध्या करपू लागले आहे. उत्पन्नाची शाश्वती आता संपली आहे. या दोन्ही पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे कपाशीवरील जे काही दहा, बारा बोंड पक्व झाली होती तेव्हढी उमलली आहे. तर मिरचीच्या झाडावरही जेमतेम आठ,दहा मिरची लागलेली आहे. एरव्ही एकरी किमान दहा क्विंटल कापूस आणि किमान एकरी दिडशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेणा:या शेतक:यांना यावर्षी जेमतेम एकरी अर्धा ते एक क्विंटल कापूस आणि पाच क्विंटल मिरचीचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे. त्यातही अनेक शेतक:यांच्या नशीबी तेही दिसून येत नाही. हे उत्पन्न काढण्यासाठी सध्या मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्या काढणीचा दरही वधारला असल्याने अनेक शेतकरी ते उत्पन्न काढण्यासही धजावत आहे. शेतातील हे निरागस चित्र पाहिल्यानंतर या परिसरातील गावेही सुन्न झाली आहेत.आपण 30 एकर मिरची लागवड केली आहे. त्यासाठी ठिबक यावर्षीच केली. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात सहा विहिरी आहेत. तेथून पाण्याचे नियोजन होते. पण यावर्षी महिनाभरापासून विहिरी कोरडया झाल्याने पाणी देणे शक्य झाले नाही. परिसरात लांब लांब अशीच अवस्था असल्याने व धरणाची सुविधाही नसल्याने पाणी आणण्याची जिद्द असली तरी आणू शकत नाही. आजवर मिरचीवर नऊ लाख रुपये आपण खर्च केले आहे. पण उत्पन्न शून्य येणार असल्याने हतबल झालो आहे. सरकारनेच आम्हाला आता मार्ग दाखवावा.                        -काशिनाथ करसन पाटील, पळाशी.