शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम पाईप लाईन टाकण्यास शेतक:यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईन टाकण्याच्या कामास स्थानिक शेतक:यांचा विरोध कायम असून हे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईन टाकण्याच्या कामास स्थानिक शेतक:यांचा विरोध कायम असून हे काम तातडीने बंद करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत यांनी केली आहे.  तहसीलदार सुनिता ज:हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईन टाकणे संदर्भात नवापूर तालुक्यातील शेतक:यांना प्रकल्पासाठी जमीन संपादीत करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटीसींवर हरकत घेण्यासाठी विहीत मुदतीत शेतक:यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याचे नाकारून हरकती दाखल केल्या होत्या. कंपनीच्या अधिका:यांनी शेतक:यांशी चर्चा करणे गरजेचे असतांना कोणतीही चर्चा न करता व कोणतीही माहिती न देता हुकुम शाही व दडपशाही पद्धतीने गुंडगिरी करीत पाइपलाईनचे काम सुरू केले आहे. त्यामुळे देशात  कायदा शिल्लक आहे किंवा नाही अशी शंका होत असून, हुकुमशाही राजवट सुरू असल्याची प्रचिती शेतक:यांना येत आहे असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी 7 नोव्हेंबर 2019 रोजी नवापूर तहसीलदारांना पाईप लाईनचे काम बंद करण्यासाठी संघटनेमार्फत निवेदन देऊनही शेतक:यांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष घातलेले नाही. आदिवासी अल्पभुधारक शेतकरी या कारणाने संतप्त झालेले असून, आता शेतक:यांनी कायदा हातात घ्यावा किंवा आत्महत्या करावी असे दोनच मार्ग उरलेले आहेत. शेतक:यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून पाईपलाईनचे काम ताबडतोब बंद करण्यात यावे. शेतकरी व कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा घडवून शेतक:यांचे म्हणणे ऐकून घेण्यात  यावे अशी मागणी करण्यात आली आहे. नवापूर तालुका संपूर्ण आदिवासी बहुल तालुका असून पेसा अॅक्ट खाली येतो. शेतकरी व ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय जमीन संपादीत करता येत नाही असे, असताना कंपनीच्या अधिका:यांनी मनमानी व हुकूमशाही पद्धतीने पाईपलाईनचे काम सुरू केले असल्याने हे काम तातडीने बंद करण्यात यावे. अन्यथा सात दिवसानंतर केव्हाही अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना व तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी तीव्र आंदोलन करतील व होणा:या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा, इशारा निवेदनातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत, बाबू नूरजी गावीत, रमेश निमजी गावीत, गेंपू नुरा गावीत, जयंत फुलजी गावीत, जेमा सुपडय़ा गावीत, सुनील वेलजी गावीत, वसंत मगन गावीत, जेरमा गुलब्या गावीत, रमेश रूबजी गावीत, मगन नेंदाडय़ा गावीत, आडक्या छिपटय़ा गावीत, जीवा नुरजी गावीत, होळया दस:या गावीत, जयराम कागडा गावीत, मोंग्या राजा गावीत, रमेश जत्र्या गावीत, मगन राजा गावीत, वेच्या रोत्या गावीत, भिंग्या गावीत, सबू गावीत व शमूवेल गावीत यांनी दिला आहे.