तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड, रजाळे, शनिमांडळ आदी गावांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. मान्सून दाखल होऊनही पावसाने हजेरी लावली नव्हती. पावसाअभावी या भागातील शेतीकामे खोळंबली आहेत. पेरण्यांना सुरुवातही झालेली नसल्याने शेतकरी चिंतीत होते. गेल्या दोन हंगामात चांगला पाऊस पडूनही कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नव्हता. यामुळे यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन घेऊन ते योग्य पद्धतीने विक्री करुन अर्थार्जन करण्याचा मानस शेतकऱ्यांचा होता; परंतु पाऊस लांबत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही काळात पावसाचे प्रमाण वाढल्याने या भागातील जलसाठे भरुन गेल्याने बागायती शेतीला प्राधान्य मिळत आहे. दरम्यान, न्याहली, बलदाणे या भागातही दुपारी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यात पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST