दरम्यान, मोहिदा येथील टमाटर उत्पादक शेतकरी आनंद चौधरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ऐन जून, जुलैच्या महिन्यात टमाटरचे उत्पादन होणार असून, त्यावेळेस भाव चांगला मिळतो म्हणून, टमाटरची लागवड करण्यात आली आहे. तसेच स्वत:च्या वाहनाने सुरत येथील बाजारपेठेत टमारटचे पीक विक्रीसाठी घेऊन जातो. त्यामुळे नफाही मिळेल, या आशेनेच टमाटरची लागवड करण्यात आली आहे.
आंतरपिकाच्या माध्यमातून भाजीपाल्यासह विविध फळांचीही लागवड करीत उत्पादन घेत आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मोठ्या परिश्रमातून फळबाग लागवड करीत असल्याने संपूर्ण कुटुंबाचे या पिकांकडेच लक्ष असते. कधी-कधी तर निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घटही येते. परंतु, मी नेहमी आलटूनपालटून फळांची लागवड करीत असल्याने त्यातून फायदाच होतो. तसेच जून-जुलैमध्ये टमाटरचे नक्कीच चांगले उत्पादन येईल, अशी आशा आहे.