शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या हमीभावासाठी शेतक:यांचा ‘रास्तारोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:34 IST

नंदुरबार : हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या कापूस खरेदीचा विरोध करत शेतक:यांनी पळाशी येथील नंदुरबार बाजार समितीच्या राजीव गांधी ...

नंदुरबार : हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या कापूस खरेदीचा विरोध करत शेतक:यांनी पळाशी येथील नंदुरबार बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर संताप व्यक्त करत आंदोलन केल़े मालाचा दर्जा चांगला असूनही व्यापारी कापसाला कमी भाव देत असल्याने शेतकरी व व्यापा:यांमध्ये वादावादी झाली़  मंगळवारी सकाळी नियमित कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर व्यापा:यांनी 5 हजार 500 या हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदीला सुरुवात केली़ यावेळी शेतक:यांनी खरेदी केंद्राच्या बोर्डावर 5 हजार 645 ते 5 हजार 699 असे प्रतिक्विंटल दर असताना 5 हजार 100 रुपयांच्या दराला विरोध केला़ यानंतर व्यापा:यांनी खरेदी बंद केल्याचे सांगितल्याने वाद चिघळला़ यावेळी संतप्त शेतक:यांनी नंदुरबार ते वाका रस्त्यावरील पळाशी फाटय़ावर रास्तारोको करत जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांना संपर्क करत तक्रार केली होती़ जिल्हाधिका:यांच्या सूचनेनंतर  मध्यस्थी करण्यासाठी तहसीलदार नितीन पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत  शेतक:यांची समजूत काढली होती़ दोघा अधिका:यांच्या मध्यस्थीने रास्तारोको मागे घेणा:या शेतक:यांनी खरेदी केंद्रातच ठिय्या मांडून बाजार समितीच्या सभापतींनी केंद्रावर येऊन तोडगा काढण्याची मागणी केली़ यानुसार सभापती देवमन पवार व संचालक डॉ़ सयाजीराव मोरे यांनी शेतकरी आणि व्यापारी या दोघांची बैठक घेत शेतक:यांच्या मालाच्या प्रतवारीनुसार व्यापारी भाव देतील असे सांगितले होत़े यानंतरही शेतक:यांचे समाधान न झाल्याने अखेर व्यापा:यांनी 5 हजार 350 ते 5 हजार 616 रुपये प्रतिक्विंटल दर देण्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा खरेदीला सुरुवात करण्यात आली़ बाजार समिती सकाळपासून 60 वाहनांची आवक झाली होती़ या आवकममुळे केंद्रावर मोठी गर्दी होती़ व्यापा:यांनी खरेदी सुरु करतानाच 5 हजार 100 रुपयांनी सुरुवात केली़ यात दोन वाहनांमधील कापूस खरेदी झाला़ परंतू या दरांना आक्षेप घेत शेतक:यांनी खरेदी बंद पाडली़ सीसीआय 5 हजार 450 आणि सूतगिरणी 5 हजार 800 र्पयत दर देत असताना दरांमध्ये घट आणण्याचे कारण विचारल्यानंतर आंदोलनाला तोंड फुटल़े सकाळी 11 वाजेपासून सुरु झालेल्या या प्रकारामुळे तळोदा ते नंदुरबार दरम्यानची वाहतूक अर्धा तास बंद झाली होती़दुपारी खरेदीनंतर खरेदी केंद्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार कापसाचे दर हे 5 हजार 350 ते 5 हजार 616 एवढे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े एकीकडे कमी दरात खरेदी होत असताना 5 हजार 450 रुपये दर देणा:या सीसीआयने अद्यापही कापूस खरेदी केलेली नाही़ सीसीआयचा जिनिंग मालकांसोबत असलेला भाडेपट्टय़ाचा वाद अद्यापही शमलेला नसल्याने कापूस खरेदीच झालेली नाही़ आंदोलन सुरु असताना सीसीआयचे अधिकारी किंवा कर्मचारी याठिकाणी उपस्थित नसल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली़