शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पदंतेश्वर कारखाना परत मिळविण्यासाठी शेतक:यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 12:25 IST

जिल्हाधिका:यांना निवेदन : सर्व प्रक्रियेची नव्याने चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य सहकारी बँकेने विक्री केलेल्या साखर कारखान्यांची गुन्हा अन्वेशन विभागामार्फत सुरू असलेली चौकशी निष्पक्षपातीपणे करावी. कारखाना पुन्हा शेतक:यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली. यासाठी शेतक:यांनी अर्धनगA आंदोलन देखील केले.संघटनेचे राज्य पदाधिकारी रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा  गुरुवारी दुपारी काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कारखाना शेतकरी, शेतमजूर व सभासदांच्या आर्थिक भांडवलावर उभा राहिला आहे. मात्र कारखाना पूर्ण  क्षमतेचे सुरू असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने तो विक्रीचा घाट घातला. यादरम्यान राज्यातील अनेक कारखान्यांवर राज्य सहकारी बँकेचे कर्ज असताना पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याची विक्री करण्यात आली. सत्तेचा दुरुपयोग करून कारखान्याची 150 कोटींची मालमत्ता असताना फक्त 47 कोटींमध्ये कारखान्याची विक्री करण्यात आली. कारखाना विक्री झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यात आले. कारखाना विक्री झाला तेव्हा ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, मजूर व वाहतूक खर्च देणे बाकी होते. ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही. कारखान्यासाठी शेतक:यांची जमीन व ऊस असताना त्यांच्या मुलांना कारखान्यात रोजगार दिला जात नाही. बाहेरील लोकांना येथे रोजगार दिला जातो. या सर्व कारणांमुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, वसंत पाटील, गोरख पाटील, नथ्थू पाटील, मुकेश पाटील, सुरेश पाटील, श्रीपत पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.