लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील दुष्काळी गावांची पहाणी पालकमंत्री जयकुमार रावल व खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली.पालकमंत्री रावल यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.मोरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते. तापी-बुराई योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन नागरिकांना सप्टेंबरपयर्ंत याचा लाभ मिळू शकेल. पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून हाटमोहिदा येथे पंप बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. हाटमोहिदा-निंबेल, निंबेल-आसाणे आणि आसाणे- शनिमांडळ पाईपलाईनचे कामदेखील वेगाने पुर्ण करण्याच्या सुचना अधिका:यांना देण्यात आल्या. खोक्राळे, वैदाणे, खर्दे खुर्द, सैताणे, बलवंड, रजाळे, ढंढाणे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी कायमची सुविधा करण्यावर भर देण्यात येईल. खोक्राळेसाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळविण्यासाठी न्याहली ग्रामस्थांशी संवाद साधण्यात येईल. वैंदाणे येथे विंधनविहीरीच्या कामास मंजूरी देण्यात येईल. असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तत्पूर्वी रावल यांनी हाटमोहिदा येथे तापी-बुराई प्रकल्पाची पाहणी केली.
पालकमंत्र्यांसमोर शेतक:यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:49 IST