शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रोझवा लक्कडकोट, कोठार, वरपाडा गावातील शेतकरी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रोझवा लक्कडकोट, कोठार, वरपाडा गावातील शेतकरी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान           सन्मान योजनेपासून वंचित राहत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.या गावांमधील शेतक:यांनी मागील चार ते पाच महिन्यांपासून आपापले बँक पासबुक, आधारकार्डसह कागदपत्रे संबंधित तलाठय़ांमार्फत प्रशासनाकडे तीन ते चार वेळा जमा करूनही अद्यापपावेतो या योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये अद्याप मिळालेली नाही. रोझवा पुनर्वसन येथील 211, रोझवा 55, कोठार 59 तर लक्कडकोट 32 या शेतक:यांनी तळोदा प्रशासनाकडे कागदपत्रे जमा करूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच शेतक:यांकडून अद्यापही वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.रोझवा पुनर्वसनसह परिसरातील शेतक:यांचे बँक खाते हे बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा येथे असून, सरदार सरोवर तसेच शासनामार्फत विविध अनुदानाचे व्यवहार बँकेतूनच होत असतात. मात्र तळोदा प्रशासन व संबंधित बँकेच्या गलथान कारभारामुळे बँकेचे खाते नंबर अद्यावत नसल्याचे दाखवण्यात येत असून, या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. परंतु या खातेनंबरवर व्यवहार चालू असून, ते अद्यावत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून शेतक:यांना  योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.