शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

बाजरीची खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील रब्बी हंगामातील भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मका, ज्वारी धान्याची शासनाकडून मंदाणे व ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील रब्बी हंगामातील भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मका, ज्वारी धान्याची शासनाकडून मंदाणे व शहादा येथे खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु भरड धान्यात फक्त मका व ज्वारीचीच खरेदी शासनाकडून होत असल्याने बाजरीचीही खरेदी शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहेयाबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथे आदिवासी उपययोजनेअंतर्गत व शहादा येथे बिगर आदिवासी उपयोजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्र सरकारने सुरू केले. मंदाणे येथे आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मंदाणे येथे खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आदिवासी उपयोजनेचे चेअरमन बी.जी. पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मोरे, शहादा उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रतवारीकर एन.बी. पावरा, वरिष्ठ सहाय्यक बी.एन. जमादार, रवींद्र पाटील व शेतकरी उपस्थित होते. शासनाकडून सर्वच पिकांना चांगला हमीभाव मिळेल या विचाराने बळीराजाने खरीप व रब्बीत घेतलेले उत्पन्न साठवून ठेवले होते. परंतु जगात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाने बळीराजाच्या सर्वच आशा सिमित झाल्या. लॉकडाऊनमुळे बाजारातपेठा बंद करण्यात आल्याने शेतमाल विक्रीसाठी कसा न्यावा ही मोठी समस्या निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये शासनाने शेतमाल खरेदी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात याबाबतची मागणी सर्वत्र शेतकºयांकडून होऊ लागली. त्याची दखल घेत शासनाने सीसीआयमार्फत कापूस व पणन विभागामार्फत भरड धान्य खरेदी सुरू केले. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी-नाले वाहू लागले. बंद पडलेल्या विहिरीही जीवंत झाल्या. त्यामुळे खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया जरी गेला तरी मात्र विहिरींना पुरेसे पाणी असल्याने रब्बी हंगाम चांगला आला. त्यात शेतºयांनी गहू, हरभरा, मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतले. परंतु जेव्हा शेतातून माल घरी आला तेव्हा मात्र कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले व संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आल्या. घरी आलेला माल घरातच पडून होता. लॉकडाऊनमुळे आपला माल कसा विकला जाईल, पुन्हा आपल्यावर आसमानी संकट उभे तर राहणार नाही ना? या विचाराने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. याबाबत पुन्हा एकदा शासनस्तरावर मागणी करण्यात आली. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने भरड धान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा तालुक्यात आदिवासी व बिगर आदिवासी विभागा अंतर्गत येणाºया गावांमधील शेतकºयांकडून भरड धान्य खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यात मका व ज्वारी खरेदी केली जात आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत येणाºया एकूण ११२ गावांमधील शेतकºयांचा माल मंदाणे येथील आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात व बिगर आदिवासी भागातील शेतकºयांचा माल शहादा येथील खरेदी-विक्री संघात जिल्हा पुरवठा विभागाकडून खरेदी करण्यात येत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार मका पिकासाठी एक हजार ७६० रुपये शासनाने हमी भाव दिला आहे तर ज्वारीसाठी दो हजार ५०० रुपये हमीभाव देण्यात आला आहे. बाजरीसाठी एकरी १८ क्विंटल व ज्वारीसाठी एकरी नई क्विंटलची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकºयांनी आपली नावे प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर येऊन नोंदणी करणे आवश्यक असून येताना तलाठीकडून ज्या धान्याची विक्री करायची आहे त्याबाबतचा रब्बी हंगामातील पिकपेरा नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व धान्याचे नमुने सोबत आणणे गरजेचे आहे. मका व ज्वारीबरोबरच बाजरीचीही खरेदी करून शेतकºयांना दिलासा द्यावा. या बाबीकडे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे आणि भरड धान्यात बाजरीचीही खरेदी करण्यात यावी, अशी मागणी बाजरी उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

मंदाणेसह परिसरात बाजरीचे यंदा सर्वात जास्त प्रमाणात उत्पन्न घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या घरात बाजरी येऊन ठेपली असून बाजारात विक्रीसाठी लॉकडाऊनमुळे घेऊन जाता येत नसल्याने बाजरी उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने भरड धान्य खरेदी सुरू केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शासनाच्या परिपत्रकात भरड धान्य खरेदीत मका, ज्वारी, बाजरी, साय अशा धान्यांची शेतकºयांकडून खरेदी करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. परंतु तरीही खरेदी केंद्रांवरील प्रतवारीकार, सहाय्यक कर्मचाºयांना वरिष्ठ विभागाकडून फक्त मका, ज्वारीचीच सध्या खरेदी करावी, बाजरीची खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व शेतकºयांमध्ये समज-गैरसमज निर्माण होत आहेत.

भरड धान्य खरेदीत मका, ज्वारीबरोबरच बाजरीचीही खरेदी करावी याबाबत शेतकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली आहे. शेतकरी बाजरी खरेदीची मागणी करीत असल्याची माहिती आम्ही जिल्हा प्रशासनाकडे तसेच पुरवठा व पणन विभागाकडे कळविली आहे. बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी रास्त असून लवकरच त्याबाबत वरिष्ठस्तरावर निर्णय घेतला जाईल.-के.डी. गाडे, विभागीय उपप्रादेशिक अधिकारी.शासनाने भरड धान्य खरेदी सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. कारण कोरोनामुळे कृषीमाल कवडीमोल भावाने विकला जात होता. हे खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकºयांमध्ये समाधान आहे. परंतु मंदाणेसह परिसरात यावर्षी बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर असल्याने शासनाने बाजरी पिकाचीही खरेदी सुरू करावी.-किशोर मोरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.