शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

किसान, मजदूर अधिकार संमेलनात केंद्र सरकारच्या कायद्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  शहादा तालुक्यातील काथर्दे पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी किसान मजदूर अधिकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  शहादा तालुक्यातील काथर्दे पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी किसान मजदूर अधिकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगारविरोधी बिलाची होळी करण्यात आली.मंगळवारी रॅली काढून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसोबत जनार्थ आदिवासी विकास संस्था, फुले आंबेडकर        स्टडी सर्कल, राष्ट्र सेवा दल, विचारधारा फउंडेशन, इब्टा, अ.भा. किसान सभा, नर्मदा बचाओ आंदोलन व अन्य समविचारी संस्था या संघटनाचे प्रतिनिधी काथर्दे दिगर  येथे पोचले. याठिकाणी  मशाल पेटवून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी  कायद्यांची होळी करत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  प्रस्तावना चेतन साळवे यांनी केली.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयांच्या कार्यकारी समितीच्या सदस्या, मेधा पाटकर यांनी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांचे जे हाल झाले त्याबद्दल  व्यथा व्यक्त करत शेतकऱ्यांकडे धरती असेल, पाणी असेल, मेहनत असेल तर दान नको. शेती आणि    उद्योग यामधील विषमता ही स्वातंत्र्यापासून आजतागायत मिटलेली नाही, या तीन कायद्यांमुळे ती टोकाला पोचणार आहे. शेतकऱ्यांनाच नव्हे तर निसर्गावर जगणाऱ्या  प्रत्येक समूहाच्या प्रत्येक उत्पादनाला सर्व खर्च आखून त्याच्या दीडपट हमीभाव हा मिळालाच पाहिजे व तो न देणाऱ्याला जेल व दंड करण्याचा कायदा पंजाब, राजस्थान, छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही तत्काळ पारित करणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील कृषी उत्पन्न बाजार   समितीत केलेली पाहणी व हस्तक्षेप दाखवून देतो आहे की, शेतकी माल खरेदी करताना सीसीआयसारख्या केंद्रीय संघटनाही आदेशांचे पूर्ण पालन करत नाहीत व त्यासाठी संघर्ष केला तरच कापसासारख्या पिकालाही योग्य भाव मिळवून देऊ शकतो असे सांगितले. प्रसंगी  प्रा.प्रदीप पाटील यांनी शेतकरी कायद्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचे शोषण करतील असे सांगितले.  विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले.   इब्टा संघटनेचे  दादाभाई   पिंपळे यांनी कृषी कायद्यामुळे लहान शेतकरी उद‌्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले असून दररोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा कायदा म्हणजे केवळ सरकारचा दांभिकपणा असल्याचे सांगितले.  जनार्थच्या महिला किसान अधिकार मंचातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला तसेच एकल महिलांच्या समस्याच मांडल्या.  ताराबाई मराठे यांनी आदिवासी शेतकऱ्यांना  संघटित होऊन लढण्याचे आवाहन केले.  अनिल  कुवर यांनी  केंद्र सरकारने  नोटबंदी, जीएसटी,                 ३७० कलम व राममंदिर निर्माण सारखे निर्णय घेत देशात महामारीची परिस्थिती असताना संसदेत किसानविरोधी बिल पारित करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे सांगितले.  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दयानंद  चव्हाण यांनी  देशात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार  कायद्यात बदल करून देशातील शेतकऱ्यांना व शेतमजुरांना दारिद्र्याकडे वाटचाल करण्याचे काम हे सरकार करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विजय वळवी  तर आभार लतिका राजपूत यांनी मानले.  या वेळी ओरसिंग पटले, लालसिंग वसावे, धरमसिंग वसावे, पुन्या वसावे, नूरजी पाडवी, नाथ्या पावरा, मांगल्या पावरा आदींनी परिश्रम घेतले.