शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कॅांग्रेसच्या किसान बचाव रॅलीत २२५ ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:28 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे किसान बचाव रॅली काढण्यात आली. ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे किसान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. २२५ ट्रॅक्टरची रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले      होते. पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शहरातील वळण रस्त्यावरून या रॅलीला सुरुवात झाली. वाघेश्वरी चौफुली, धुळेनाका, नाट्यगृह, दिनदयाल चौक मार्गे रॅली काढण्यात आली. या रॅलीत २२५ शेतकर-यांनी ट्रॅक्टर सहभागी केले होते. त्यांना केळी, ऊस, कापूस, ज्वारीचे ताटे लावून शेतीमध्ये असलेली वस्तूस्थिती  प्रदर्शीत केली. केंद्र शासन जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे मागे घेत नाही. कामगार विरोधी कायदे रद्द करीत नाही तोपर्यंत जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री पाडवी यांनी सांगितले. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल, व्यापा-यांचा त्यात फायदा आहे. कामगारांच्या       विरोधात कायदे करून उद्योजकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काॉंग्रेस त्याला पुर्ण ताकदीने विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीने केंद्र सरकारच्या विरोधातील असंतोष दिसून आला. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीत आमदार शिरिष नाईक, जिल्ह्याचे प्रभारी पानगव्हाणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, काॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, पदाधिकारी विश्वास पाटील, किसान सेलचे अशोक  पाटील,  कॅांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष नरेश पवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश चौधरी,  यांच्यासह    पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.