लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील वर्षातील दोन्ही हंगाम पुरेशा पाण्याअभावी बळीराजाला उत्पन्न घेता आले नव्हते. ती उणिव भरुन काढण्याच्या आशेवर शेतकरी यंदाच्या खरीप हंगामावर भरघोस उत्पन्नाची अपेक्षा करीत होता. परंतु हाही हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला. खरीपातील नैसर्गिक अवकृपेचे ओङो सोबत शेतकरी पुन्हा यंदाचा रब्बी हंगाम निश्चितच तारेल या आशेवर पुन्हा कामाला लागला आहे. काही वर्षापासून सातत्याने निसर्गाचा लहरीपणा सुरू आहे. मागील वर्षी अपेक्षेनुसार पाऊस पाऊस झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक घटकात पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, तर शेतक:यांवर मोठे संकट ओढवले होते. पाऊस तथा पाण्याअभावी खरीपसह रब्बी हंगामदेखील शेतक:यांना सोडावा लागला होता. या दोन्ही हंगामातील झालेले नुकसान यंदाच्या खरीब हंगामात भरुन काढता येईल, या आशेवर शेतकरी कामाला लागला होता. सुरवात वगळता काही प्रमाणात पाऊस चांगला राहिल्यामुळे भरघोस उत्पन्नाची स्वपAे जिल्ह्यातील बहुतांश शेतक:यांनी रंगवली. परंतु आवश्यकता नसतानाही पाऊस सुरूच राहिला. त्यातच अतिवृष्टी देखील झाली, अतिवृष्टीनंतर काही दिवस वगळता सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे परिपक्व झालेली पिके सडत गेली अन् शेतक:यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पाहता-पाहता पावसाने हिरावून नेला. यंदा उद्भवलेले संकट प्रत्येक शेतक:यांना नाकी नऊ आणणारे ठरत आहे. या शेतरक:यांना आता केवळ शासकीय मदतीकडे लक्ष लागून आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतक:यांनी सहा महिन्यांची मेहनत व लाखोंचा खर्च चांगला उत्पन्नाच्या आशेवरच केला होता. त्यांची ही सर्व स्वपAे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असून ते एकप्रकारे त्यांच्या जीवनाचे ओङो आहे. खरीपातील या ओङयासह महासंकटाचा फारसा विचार न करता श्ेतकरी राजा पुन्हा रब्बी हंगामासाठी तयारी करीत आहे. रब्बीत निसर्ग कितपत साथ देतो, याचाही फारसा विचार न करता, नेहमीप्रमाणे यंदाही शेतकरी बांधावर पोहोचला आहे. मशागतीसह विविध कामे सुरू केली आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.
पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, म्हणून कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. मागील तीन वर्षातील बियाणे विक्रीचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर, गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.