लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल आटून शेतात लावलेली पिके पाण्याअभानी जमिनदोस्त होत आह़े शेतात होत असलेली दुर्दशा न पाहवल्याने तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक:याने दोन एकरातील सुमारे पावणे दोन हजार झाडांवर नांगर फिरवला आह़े या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आह़े मोड येथील भिमा गिरधर चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी कळमसरे शिवारातील पाण्याच्या बळावर दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली होती़ एका एकरात 850 याप्रमाणे रोपांची लागवड त्यांनी केली होती़ यासाठी एकरी 30 हजार रुपयांर्पयतचा खर्च करत त्यांनी पपईचे संगोपन सुरु केले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका पूर्णपणे आटली़ चौधरी यांच्याकडे पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने पपईवर मर येऊन दुर्दशा आणखीन वाढली़ यातून संपूर्ण दोन एकरात चांगल्याप्रकारे वाढ झालेली पपईची झाडे जमिनीवर कोसळली़ ही झाडे पुन्हा सुस्थितीत येण्याची चिन्हे नसल्याने शेतक:याने छातीवर दगड ठेवत संपूर्ण दोन शेत नांगरुन टाकल़े यावेळी परिसरातील शेतकरीही उपस्थित होत़े मोठा खर्च करुन क्रॉप कव्हरसह पपई रोपाची करुन लागवड करुन उज्ज्वल भविष्याची नांगरटी होत असल्याचे पाहून उपस्थित शेतक:यांच्या डोळ्यातही अश्रु आले होत़े यंदा भिषण दुष्काळाची धग भोगणा:या तळोदा तालुक्यात शेतातील सारे पिकच काढून फेकण्याचे प्रकार दरदिवशी घडत असल्याचे दिसून येत आहेत़ मोड परिसरातील गावांमध्ये ब:याच शेतांमध्ये पाण्याअभावी केळी आणि पपईची शेती हाताबाहेर जात असल्याने अनेक शेतक:यांनी शेतात जाऊन पाहणेही सोडून दिले आह़े यामुळे कजर्बाजारी होण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े यातून केवळ निसर्गच शेतक:याना तारु शकणार असून आभाळाकडे शेतक:यांच्या नजरा लागल्या आहेत़
तळोदा तालुक्यात यंदा 364 हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात आली आह़े यातील बहुतांश क्षेत्राला वाढत्या तापमानाचा फटका बसत आह़े तालुका कृषी अधिकारी प्रविणकुमार भोर यांनी याबाबत सांगितले की, 43 अंशार्पयत तापमान गेल्यामुळे कमी वाढ झालेले रोपटे पिवळे पडून जागीच कोसळत आह़े यातून पाण्याचा अभाव असल्यास मोठय़ा प्रमाणावर हानी होत आह़े शेतकरी चौधरी यांनी प्रत्येकी 14 रुपये याप्रमाणे रोपांची खरेदी करुन आणली होती़ दोन महिन्यात दोन तीन फूटार्पयत झाडांची वाढ झाली होती़ परंतू पाणीच नसल्याने त्यांची जागीच वाताहत झाली़ आजअखेरीस बोरद, मोड, कळमसरे, मोहिदा, तळवे, आमलाड आदी ठिकाणी पपई रोपांची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी न मिळाल्यास येथेही नुकसान अटळ आह़े