लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मिरवणुका आणि इतर परंपरांना फाटा देत कानुमातेला सोमवारी निरोप देण्यात आला. दरम्यान, विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.नंदुरबार जिल्ह्यात श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाईची स्थापना केली जाते. सोमवारी सकाळी कानुबाईला निरोप देण्यात आला. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाजतगाजत मिरवणुका निघतात. यंदा मात्र मिरवणुकांना फाटा देण्यात आला. त्याऐवजी कुटूंबातील पाच ते सहा व्यक्तींनी मिळून विसर्जन ठिकाणी जाऊन मातेला निरोप दिला. नंदुरबारात कल्याणेश्वर मंदीर, पाताळगंगा नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
नंदुरबारात पारंपारिक रित्या कानुबाईला दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:35 IST