शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कांद्याचे दर घसरल्याने शेतक:यांचे झाले वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे कांदा सडल्याने आंतरराज्य पातळीवर ा कांद्याचे दर घसरले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर संकट ओढवले आहे.नेहमीप्रमाणे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात  लागवड करण्यात आली. त्यात बलवंड, रजाळे, शनिमांडळ, सैताणे, ऐचाळे, खर्दे, तलावडे, वैंदाणे यासह अन्य गावांचा समावेश होतो. चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून बहुसंख्य शेतक:यांनी  कांदा लागवडीला प्राधान्य दिले.  परंतु अतिवृष्टीनंतर सातत्याने पाऊस सुरू राहिला. शिवाय   परतीचा पाऊस होत नाही,  तोच पुन्हा अवकाळी पाऊसही          झाला. त्यामुळे कांदा सडल्याने  उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका येथील शेतक:यांना  बसला. लागवडीच्या तुलनेत निघालेल्या उत्पादनात 90 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहेत. तर उर्वरित 10 टक्के कांदा सडल्याने अपेक्षेनुसार  भाव मिळत नाही. परिणामी  लागवड करतांना झालेला खर्च देखील काढणे शेतक:यांना आव्हान ठरले आहे. त्यामुळे कांदा लागवड करणा:या शेतक:यांना सुरुवातीपासूनच कांदा रडवत आल्याची व्यथा नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांमधून मांडण्यात येत आहे. या भागात लागवड केला जाणा:या कांद्याला संपूर्ण महारराष्ट्रासह इंदौर, अहमदाबाद या ठिकाणी देखील मोठी मागणी असते. इंदौर, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये सुरुवातीला कांद्याला  पाच हजार 500 र्पयत भाव दिला गेला. यंदा मात्र हे भाव निम्म्याने  घटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार 500 पासून तीन हजार 500 र्पयतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक:यांना झालेला खर्च काढणे देखील गिकरीचे झाले आहे. केंद्र शासनामार्फत परदेशातून कांद्याची आयात करण्यात आल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याचे म्हटले जात आहे. निसर्गाच्या अवकृपेनंतर शासनाकडूनही मदतीसाठी अपेक्षेनुसार कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांना वाली कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे बलवंड भागातील कापसाचे मोठे नुकसान झाले. बोंडेच सडून गेल्यामुळे कापूस हाती आला नाही, तर हाती आलेला कापूस दर्जेदार नसल्यामुळे त्याला अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. त्यानंतर या भागातील लागवड झालेल्या कांदा पिकांचे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कापसानंतर शेतक:यांना कांद्याने देखील रडविले असल्याची भावना वतयक्त करण्यात येत आहे