नीलेश महाजन हे मूळ कळंबू येथील रहिवासी असून १२ पर्यंतचे शिक्षण हे कळंबू येथील डी. जी. विद्यालयात झाले होते. बारावीनंतर मालपूर, ता. शिंदखेडा येथे मामाकडे राहत असताना दोंडाईचा येथील रावल महाविद्यालयात शिक्षण सुरू होते. २०१६ मध्ये सैन्यदलात भरती झालेले नीलेश हे प्रशिक्षणानंतर आर्मीच्या पाँयु मराठा युनिटमध्ये मणिपूर येथे कार्यरत होते. या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना २०२० मध्ये त्यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. यातून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.
शहीद नीलेश यांचे पार्थिव गुवाहाटी येथून विशेष विमानाने धुळे येथे रविवारी रात्री उशिरापर्यंत आणण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शहीद नीलेश यांचे........................... दिलीप महाजन हे १९९४ मध्ये श्रीनगर येथे देशसेवा करत असताना शहीद झाले होते. नीलेश यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली असून युवकांकडून गावात शहीद जवानाच्या आठवणी सांगणारे फलक लावण्यात आले आहेत.