शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ हे सर्व विद्यार्थी परराज्यातील रहिवासी असून लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावी रवाना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे़ तूर्तास येथे थांबलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक संस्थेने स्वखर्चाने तैनात केली आहेत़अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत मोठ्या संख्येने देश तसेच विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ यंदाही सुमारे १२ हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले होते़ एप्रिल पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपणार असल्याने बहुतांश विद्यार्थी मार्चच्या मध्यात घराकडे रवाना झाले होते़ सुमारे सहा हजार विद्यार्थी घराकडे गेले असताना २२ मार्चनंतर लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाल्याने बहुतांश विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ या विद्यार्थ्यांचे रेल्वे आणि बसचे रिझर्व्हेशन ३ एप्रिल रोजी होते़ परंतू लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी सध्या जामिया वसतीगृहातच अडकून पडले आहेत़ मंगळवारी या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच जामिया संस्थेतील सोयी सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, डॉ़ गयधर, डॉ़ प्रदीप गोयल, डॉ़ स्वप्नील चौधरी, आरोग्य सहायक अभितन पावरा यांच्यासह आरोग्य सहायक व सेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती संकलित करण्यात आली़ डॉ़ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनेटायझर व हँडवॉशचा वापर करण्याच्या सूचना केल्या़ जामिया अहमद गरीब युनानी रुग्णालयाचे संचालक मंडळ व वैद्यकीय अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते़ येथील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून सूचना करण्यात येत आहे़सद्यस्थितीत मदरशात ६ हजार ४८९ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ हे विद्यार्थी सध्या वसतीगृहात निवासी म्हणून आहेत़ सर्वाधिक ३ हजार ३२४ विद्यार्थी हे बिहार राज्यातील आहेत़ महाराष्ट्र ८४१, आसाम ८८३, पश्चिम बंगाल ३७७, झारखंड ३५०, मध्यप्रदेश १३५, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ७५, मणिपूर ७२, जम्मू आणि काश्मिर ६४, कर्नाटक ६४, हरीयाणा ५५, राजस्थान ४६ दिल्ली ३६, आंध्रप्रदेश १३, मेघालय १२, ओरिसा ८, हिमाचल प्रदेश ४, तेलंगणा ४, गोवा २ तर पंजाब राज्यातील एक विद्यार्थी येथे थांबून असल्याची माहिती आहे़येथे मुक्कामी असलेल्या सर्व सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी रेल्वे आणि बसेसचे आरक्षण होते़ तशी तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवली होती़ परंतू लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आता येथे थांबावे लागत आहे़ आवारात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे़ तसेच संस्थेने कर्मचारी नियुक्त करुन स्वच्छता कायम ठेवली आहे़ औषध फवारणीसह विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्यावर सॅनेटायझर शिंपडण्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत़ विद्यार्थी एकमेकांपासून लांब राहतील यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने दर दिवशी मास्कचा वापर करण्यासह विविध विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करत आहेत़