शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून खर्डी नदीचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांना प्रचंड वेग आला असून, पाच ते सहा दिवसातच ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांना प्रचंड वेग आला असून, पाच ते सहा दिवसातच खर्डी नदीतील जलपात्राचे दोन किलोमीटर र्पयत खोलीकरण व रूंदीकरण करून ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे करण्यात आले आहे.  दरम्यान कार्यकत्र्याचा उत्साह पाहून शहरातील विविध प्रतिष्ठित  नागरिकही कामांच्या ठिकाणी भेट देवून सढळ हाताने लोकवर्गणी देत आहेत.तळोदा शहरासह संपूर्ण तालुक्यात कधी नव्हे एवढी यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साहजिकच या दुष्काळाची झळ सामान्यांपासून तर सर्वानाच बसत आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे केल्याशिवाय पर्याय नाही, अशी जाणीव शहरवासीयांना झाली. त्यातच माळी समाजातील काही तरूणांनी  हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी नांगरटी व खोलीकरण करण्यासाठी तालुका आणि प्रशासनाची  परवानगी घेतली. प्रत्यक्षात शुक्रवारपासून शहरानजीकच्या खर्डी  नदीच्या पात्रातील खोलीकरणाचा शुभारंभ जेसीबी यंत्राने करण्यात आला. लोकसहभाग व लोकवर्गणीतून हाती घेण्यात आलेल्या या कामाने प्रचंड वेग घेतला असून, पाच ते सहा दिवसातच खर्डी नदीपासून तर दलेलपूर र्पयतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या पात्राचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर  ठिकठिकाणी 10 बाय पाचचे मोठ-मोठे खड्डेदेखील करण्यात आले               आहे. साहजिकच या कामांमुळे  प्रचंड जलसाठा निर्माण होणार  आहे. तसेच बहुतेक ठिकाणी  नदीचे पात्र अतिशय रूंद झाले  होते. शिवाय प्रवाहही बंद झाला होता. विशेषत:  तरूणांनी या  उपक्रमात मोठय़ा प्रमाणात प्रत्यक्षात सहभाग घेतलाअसून, तेच अधिक परिश्रम घेत आहेत. त्यांचा हा  उत्साह पाहून शहरातील प्रतिष्ठित नागरिकही कामांच्या ठिकाणी भेट देवून सढळ हाताने आर्थिक मदत करीत आहे. सद्या पोकलॅण्ड  यंत्राच्या सहाय्याने खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे.  नदीतील गाळ उपसण्यासाठी काही ट्रॅक्टर मालकांनी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे खर्डी नदीच्या पात्रात वाहतुकीची अक्षरश: वर्दळ सुरू  आहे.