शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शहादा तालुक्यातील केळीची परदेशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

शहादा तालुक्‍यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील असून विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या शेतमालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच पाडळदा ...

शहादा तालुक्‍यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील असून विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या शेतमालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच पाडळदा येथील सेवानिवृत्त उपअभियंता शरद गोविंद पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेतीचा विचार केला. परंतु पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे त्या ज्ञानाचा वापर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन पाच वर्षांपूर्वी शेती कसणे सुरू केले. त्यात त्यांनी अवगे-जुनवणे शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच एकरात जी-९ वाणाच्या सहा हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली. लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ज्ञांकडून माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली. ही बाग पाहण्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या १२०० रुपयांहून अधिक प्रती क्विंटल दर मिळत असून केळीचा दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केटपेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यालाही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून वाहन भरले जाते. थेट मुंबईला रवाना झाल्यानंतर ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. त्यानंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका सिझनला तालुक्यातून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जातात. शरद पाटील यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत पाच एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत रोपांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विंट्रेक्स क्रॉप केअर या कंपनीचे नंदकुमार पाटील, विनायक धाबुगडे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपायांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. आजपर्यंत लाखो रुपयांची केळी निर्यात केली असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. शेतीत नवखे असूनही आखाती देशात केळी जात आहे, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पाटील सांगतात.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोग करुन शेती कसल्यास आपल्या मालाची परदेशात मागणी होते. त्यातून निश्चितच शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात. भविष्यातही वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी शेती करण्याचा मानस आहे.

-शरद गोविंद पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता, शहादा