शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघातात स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:12 IST

नवापूर : शहरालगतच्या उच्छल तालुक्यात उच्छल-निझर रस्त्यावर पेट्रोल भरुन जाणारा टँकर ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात होऊन एक जण गंभीर ...

नवापूर : शहरालगतच्या उच्छल तालुक्यात उच्छल-निझर रस्त्यावर पेट्रोल भरुन जाणारा टँकर ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात होऊन एक जण गंभीर भाजल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.उच्छल-निझर रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. वडपाडा शिवारात एका ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. तेथे वळण रस्त्याचे फलक दिसून न आल्याने कामावर असलेल्या उभ्या ट्रॅक्टरवर पेट्रोल वाहून नेणारा टँकर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आदळला. त्यापाठोपाठ एक दुचाकीस्वार मागून ठोकला गेला. अपघातात टँकर व ट्रॅक्टर जवळच्या नाल्यात घसरत जाऊन मोठा स्फोट होऊन मोटारसायकलस्वार गंभीर भाजला गेला. त्याला व्यारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी नवापूर व सोनगढ येथील अग्निशामक दलास चार तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. उच्छलचे पोलीस निरीक्षक दवे व सहकारी घटनास्थळी धावून गेले. अपघातात पाच लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम करणाºया ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, भाजलेल्या दुचाकीस्वाराची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.