शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरमधून गोधनाची तस्करी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कंटेनरमध्ये भरून गोधनाची तस्करीचा प्रकार खेतिया येथील सामाजिक कार्यकत्र्यानी नुकताच उधळून लावला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : कंटेनरमध्ये भरून गोधनाची तस्करीचा प्रकार खेतिया येथील सामाजिक कार्यकत्र्यानी नुकताच उधळून लावला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने हा कंटेनर जात होता. दरम्यान, कारवाईच्या वेळी चालक व क्लिनर तेथून पसार झाले. सेंधवाकडून वळण रस्त्याने महाराष्ट्राच्या हद्दीत जाणा:या संशयीत कंटेनरला खेतिया येथील अतुल निकुम, अनिल सोनिस, अतुल जाधव, संदीप पाटील, शुभम पाटील, दिनेश सोनिस, विजय चौधरी, रवींद्र जगताप, जगदीश चौधरी यांनी पाठलाग करून अडविले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात दोन कप्प्यात तब्बल 53 गायी, वासरू व बैल निर्दयीपणे कोंबण्यात आलेले होते. वाहनाची अधिक तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या नंबरच्या दोन नंबर प्लेट देखील आढळल्या. याचा अर्थ मध्यप्रदेश, राजस्थानात वेगळी व महाराष्ट्रात वेगळी नंबर प्लेट लावून गोधनाची तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. सर्व गोधनाला निसरपूर येथील श्रीकृष्ण गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालक व क्लिनरचा तपास केला जात आहे. तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण मालवीय, उपनिरिक्षक अजमेरसिंह अलावा, उपनिरीक्षक नितीन अहिराव व त्यांचे सहकारी करीत आहेत.दरम्यान, राजस्थान, मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर गोधनाची तस्करी करण्यात येत असल्याचे   प्रकार वेळोवेळी उघड झाले आहेत. अशी वाहतूक    करणारी वाहने प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील नंबर   प्लेट लावून दिशाभूल करण्याचा प्रय} करीत असतात. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार गोरक्षकांनी उघड केला होता.