शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील चौघे वर्षभरासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 11:39 IST

तीनजण राजकीय पक्षाशी संबधीत : आणखी काही प्रस्ताव लवकरच निकाली

शहादा : शहाद्यातील चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. चौघांमध्ये एक माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. प्रांताधिकारी यांनी हे आदेश  मंगळवारी उशीरा काढले. आणखी काही जणांची देखील हद्दपारी लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक महेमुद उर्फ मुन्ना अहमद शेख रा. गरीब नवाज कॉलनी शहादा, एमआयएम पक्षाच्या विद्यमान नगरसेविका यांचा मुलगा साजिद रहीम पिंजारी रा.शहादा, एमआयएम पक्षाच्या नगरसेविका व आरोग्य सभापती सायराबी लियाकत सैय्यद यांचा मुलगा मोहम्मद अली लियाकत अली सैय्यद रा.शहादा व आत्माराम मोतीराम शेमळे रा. वाघोदा ता. नंदुरबार ह.मु. मलोणी ता. शहादा यांचा समावेश आहे. या चौघांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याबाबतचा प्रस्ताव शहादा पोलीस ठाण्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला होता. तेथून प्रांताधिकारी कार्यालयात गेल्यावर प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी याबाबतचे आदेश त्वरेने काढून चौघांची एका    वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपारी केली. चौघांमध्ये तीनजण राजकीय पक्षाशी संबधीत असल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी कार्यालयात आणखी काही       प्रकरणे असून त्यावर देखील लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हिस्ट्रीसिटर असलेल्यांमध्ये खळबळ उडाली   आहे. पोलिसांनी यापूर्वीच अशा प्रकारचे पाऊले उचलून संबधीतांवर वचक ठेवणे आवश्यक होते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.