महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले व सचिव बाळासाहेब माने यांच्या सूचनेवरून कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी महिला महाविद्यालयाच्या प्रा. मीनल पाटील, तर शहादा तालुका अध्यक्ष म्हणून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज चौधरी, नंदुरबार तालुका प्रतिनिधीपदी प्रा. डॉ. सविता पाटील (नंदुरबार तालुका विधायक समितीचे कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा), तळोदा तालुका प्रतिनिधीपदी प्रा. नीलेश सूर्यवंशी (कनिष्ठ महाविद्यालय, बोरद), नवापूर तालुका प्रतिनिधी म्हणून प्रा. गणेश लोहार (एच. जे. शहा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर), अक्कलकुवा तालुका प्रतिनिधीपदी प्रा. बाळू वाल्हे (एस. जे. एम. कनिष्ठ महाविद्यालय, खापर), तर धडगाव तालुका प्रतिनिधी म्हणून प्रा. बाजीराव पाडवी (कै. नारायणराव खेडकर कनिष्ठ महाविद्यालय, धडगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST