शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:32 IST

पीपल्स रिपब्लीकन पार्टी : शहादा येथील जाहीर सभेत जोगेंद्र कवाडेंचा इशारा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : देशात भाजपाचे अर्थात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्या दिवसापासून 130 कोटी जनतेचा उन्हाळा तेव्हापासून सुरु झाला आहे. शेतक:यांचे, गरीबांचे वाटोळे करणारे, जातीवादी शक्ती निर्माण करणा:या संघ विचाराच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले. पीपल्स रिपब्लीकन पार्टी पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा व जाहीर सभा शहरातील जनता चौकात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार कवाडे बोलत होते. या वेळी प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आथोते, पक्षाचे गुजरात प्रमुख सुरेश सोनवणे, प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, मराठवाडा विभाग प्रमुख अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, शशिकांत उनवणे, सचिन उनवाने, बाबू ढवळे, परशू करनकाळ, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते. या वेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांच्या देशात शेतक:यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागते हे मोठे दुर्दैव आहे. आदिवासी दलित बहुजनांवर अत्याचार सुरु आहेत. देशात भगव्यांचे व ब्राrाणवाद्यांचे सरकार आहे. ज्यांनी जागतिक क्रांती केली अशा क्रांतीकारकांचे, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उखडून टाकले. देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वाना सोबत घेऊन न्याय दिला होता. मराठी राज्याची स्थापना केली होती तेव्हा संभाजी भिडे, मोहन भागवत होते का? आता आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढणारे नेते जन्माला आले आहेत. भाजपा व संघ विचारसरणीच्या नेत्यांनी दफण झालेली ब्राrाणवादी भुते बाहेर काढली हे बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. गोविंद गायकवाड यांची भिमाकोरेगाव येथील समाधी उद्ध्वस्त करुन सरकार पुरस्कृत आतंकवाद चालवलेला आहे. या देशातील अंबानी-अदाणीला न्याय मिळतो मात्र शेतक:याला कर्जमाफीसाठी न्याय मिळत नाही. निरव, ललीत मोदी, विजय माल्या देशातील पैसा घेऊन पळून गेले  त्यांना सरकार आणू शकत नाही          परंतु शेतक:यांची संपती जप्त केली जाते. नरेंद्र मोदी हे देशाचे की जगाचे पंतप्रधान आहेत हे कळत  नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही जातीवादी शक्तीला थारा देत नाही, देशात दंगली घडविणा:यांना साथ दिली जाणार नाही. हिंदुत्व व ब्राrाणीकरण करण्याचे षड्यंत्र राज्यकत्र्यानी चालविलेले आहे. कार्यकत्र्यावर पडद्यामागचे नेते खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे सांगितले.अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, सचिन उणवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केले. सभेसाठी जितेंद्र शिरसाठ, इमरान पठाण, कमलेश मोरे, लकी मोरे, इकबाल शेख, बाबू ढवळे  यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.