शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसेवकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:30 IST

जिल्हा परिषद : 2012 पासून होते पुरस्कार प्रलंबीत, 15 जणांचा समावेश

नंदुरबार : ग्राम विकासाचा पाया भक्कम करण्यात ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची ठरते. त्यामुळे ग्रामसेवकांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी केले. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा:या ग्रामसेवकांचा पुरस्कार देवून सोमवारी गौरव करण्यात आला. दरम्यान, 2012-13 पासूनचे हे पुरस्कार आहेत.जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, लताबाई पाडवी,   जालींदर पठारे आदी उपस्थित होते.  2012 पासून जिल्ह्यातील ग्रामससेवक पुरस्कारांचे पुरस्कार रखडले होते. अखेर निवडणुकांच्या आधी त्यांना मुहूर्त सापडला व सोमवारी त्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी बोलतांना रजनी नाईक म्हणाल्या, ग्रामविकासाच्या योजना तळागाळार्पयत पोहचवल्या पाहिजेत. गावपातळीवर काम करतांना सरपंचांशी थोडाफार विवाद होत असेल परंतु तो सामोपचाराने मिटवून गाव विकासाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. रिक्त जागांचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. रणधीर सोमवंशी यांनी सांगितले, चांगल्या कामाची पावती मिळतेच. ते या  पुरस्कारांनी सिद्ध होते. ग्रामपंचायत स्तरावर 14 व्या वित्त आयोगाचा निधी बरोबरच पेसाचा निधीही मिळत असतो. त्याचा योग्य रितीने चांगला वापर करावा. येणा:या 15 व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतकडून तयार होणा:या विकास आराखडय़ात तो उपजिविका आधारीत असावा अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आता काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी ग्रामपंचायत विभागातर्फे राबविण्यात येणा:या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.  पुरस्कारार्थ्ीतर्फे ग्रामसेवक र}ाकर शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी केले.  यावेळी जिल्हाभरातील ग्रामसेवक संख्येने उपस्थित  होते.अरुणसिंग रुपसिंग कुवर, मुंदलवड, ता.धडगाव, अशोक चैत्राम लामगे, पिंप्राणी, ता.शहादा. वामन देवमन महाले, दलेलपूर, ता.तळोदा. निर्मला रुपसिंग पराडके, खुंटामोडी, ता.धडगाव. आनंदी ठोबा पावरा, चिंचकाठी, ता.धडगाव. परमेश्वर विठोबा गंडे, कारेघाट, ता.नवापूर. लिला विरसिंग पाडवी, देवमोगरा, ता.अक्कलकुवा. र}ाकर रतिलाल शेंडे, आमलाड, ता.तळोदा. दिनेश बाबुलाल राठोड, शिरवाडे, ता.नंदुरबार. दिपाली अरविंद उगलमुगले, भागापूर, ता.शहादा. कल्पना तानाजी वसावे, बोकळझर, ता.नवापूर. हिंमत रणछोड वंजारी, म्हसावद, ता.शहादा. मनोज कोमलसिंग वसावे, कडवामहू, ता.अक्कलकुवा, शोभा लोटन पाटील, दहिंदुले, ता.नंदुरबार व अमोल पुंजाजी मेहेत्रे, मोहिदा, ता.तळोदा यांचा समावेश आहे.