पश्चिम रेल्वे महाप्रबंधक अलोक बंसल हे नंदुरबार येथे आले असताना हिंदू सेवा सहाय्य समितीने त्यांची भेट घेऊन कमोडवर हिंदुस्तान नाव लिहिलेले हटविण्याविषयी निवेदन दिले होते. या निवेदनाची पश्चिम रेल्वे प्रशासनाने दखल घेत जळगाव ते उधना या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृहाततील ८९ भांड्यांवरील नाव हटविले असल्याचे पत्र दिले दिले. तसेे छायाचित्रही हिंदू सेवा सहाय्य समितीला पाठविले आहे. हिंदू सेवा सहाय्य समिती अधिवक्ता यांचामार्फत संबंधित भांडी बनविणारी कंपनीवरही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करत आहे. तसेच भारतातील सर्व ठिकाणांवरून हे कमोड हटत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, सुमित परदेशी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, मयुर चौधरी, पंकज डाबी यांनी कळविले आहे.
अखेर रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृहातील त्या भांड्यावरील नाव काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST