शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
4
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
5
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
6
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
7
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
8
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
9
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
10
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
11
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
12
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
13
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
14
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
15
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
16
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
17
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
18
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
20
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

अखेर दामिनी पथक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरातील विविध चौकात दिसून आले. अनेक ठिकाणी युवकांना पिटाळून लावण्यात आले तर काही जणांना तंबी देवून सोडून देण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.शहरातील चौकाचौकात आणि शाळा, महाविद्यालय परिसर, खाजगी क्लास परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून टारगट युवक आणि रोडरोमियोंनी उच्छाद मांडला होता. महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. पालकांनी शाळा व्यवस्थापनांकडे तक्रारी करून व शाळांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे अशा युवकांचे फावले होते. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याची गांभिर्याने दखल घेत  शहर पोलिसांना सक्तीने कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दामिनी पथक, साध्या वेशातील पोलिसांचे पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांना अशा टारगट युवकांच्या वाहनांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. दामिनी पथकाचे वाहन    सकाळी दहा ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री सात वाजेर्पयत गस्त घालतांना दिसून आले. याशिवाय या पथकांनी अनेक चौकातील टारगट युवकांना पिटाळून लावले. काहींना ताब्यात घेवून तंबी देत सोडून दिले. वाहतूक पोलिसांनी देखील टारगट युवकांच्या दुचाकींवर थेट कारवाई केल्याचे चित्र दिनदयाल चौक, पालिका चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, नेहरू चौक, मिशन विद्यालय परिसर या ठिकाणी दिसून आले. यामुळे अशा युवकांवर जरब बसली आहे. पोलिसांनी या कारवाईत   सातत्य ठेवावे अशी अपेक्षा पालक आणि शाळा व्यवस्थापनांकडून होत आहे.    

टारगट युवकांवर कारवाई नंतर काही दिवसांनी हे युवक पुन्हा त्याच वाटेला जातात. त्यामुळे अशा युवकांवर कारवाई करतांना त्यांच्या पालकांवरही ती झाली पाहिजे. जेणेकरून युवक पुन्हा त्या वाटेला जाणार नाहीत. अशा प्रतिक्रिया काही शाळांनी व्यक्त केल्या.