शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

लॉकडाऊनमध्येही हातावर पोट भरणाऱ्यांचा जीवनसंघर्ष सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे काटेकोर पालन करून प्रत्येक जण जिवाच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळत असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे काटेकोर पालन करून प्रत्येक जण जिवाच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून हातावर पोट भरणारे व शेतीकामात झोकून दिलेल्या मजुरांचा जीवनसंघर्ष मात्र सुरूच आहे. भूकेने मरण्याची जास्त भीती असल्याने हे हातकामावर जगणाऱ्यांना कोरोनाचे कोणतेच भय न बाळगता संसाराचे गाडे ओढत आहेत.शहादा शहरातील चौफेर असलेल्या मोकळ्या पटांगणात पत्र्याच्या सहाय्याने वस्तू बनवून विकणारे, भिक्षुकी करणारे, शेतमजूर व इतर स्थलांतरित नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात. शहरात बरेच कुटुंब असे हातावरचे काम करण्यासाठी रहात आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व नागरिक घरात आहेत. शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता नागरिकांमध्ये भीती पसरली असताना दुसरीकडे मात्र हे असे हातावर काम करणाºयांना कोरोनाचे काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते. हे मजूर, हातावर काम करणारे कुटुंबासोबत नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. हे स्थलांतरित हातावर काम असलेले मजूर शहरातील अनेक भागांमध्ये तंबू लावून राहतात. दिवसभर काही हातावरचे काम करून सायंकाळी त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था होते. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना कोणतेच हातावरचे काम व वस्तू विकता येत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही स्वयंसेवी संस्थांकडून तात्पुरत्या जेवणाची व्यवस्था होत असली तरी पुढील काळात संसाराचा गाडा हाकण्यासाठी कोरोनाचा सामना करत संपूर्ण कुटुंब आपल्या दैनंदिन कामात लक्ष देत वस्तू तयार करीत आहेत. अशा गरजू लोकांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था तात्पुरत्या स्वरुपाची सोय करत असल्या तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास त्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. कदाचित याची भनक त्यांना लागल्याने ते उन्हाची आणि कोरोनाची पर्वा न करतात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करताना दिसून येत आहेत.