शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात मुदत संपूनही बोंड अळींचे पंचनामे संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 60 हजार हेक्टर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाले होत़े या कापसाचे पंचनामे करण्याची मुदत ही 31 डिसेंबर्पयत होती़ मात्र मुदत संपूनही अद्याप 27 हजार हेक्टवर पंचनामे होणे शिल्लक आहेत़ पंचनाम्यांबाबत शेतकरी नाराज आहेत़ रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर शासनाने बोंडअळीमुळे खराब झालेल्या कापसाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 60 हजार हेक्टर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाले होत़े या कापसाचे पंचनामे करण्याची मुदत ही 31 डिसेंबर्पयत होती़ मात्र मुदत संपूनही अद्याप 27 हजार हेक्टवर पंचनामे होणे शिल्लक आहेत़ पंचनाम्यांबाबत शेतकरी नाराज आहेत़ रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर शासनाने बोंडअळीमुळे खराब झालेल्या कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होत़े यानुसार जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 1 लाख 18 हजारपैकी 60 हजार हेक्टर क्षेत्रात बोंडअळीचा पुरेपूर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले होत़े महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे सुरू करण्यात आले होत़े या पंचनाम्यांची मुदत ही 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले होत़े मात्र जिल्ह्यात केवळ 33 हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे करण्यात आले आहेत़ उर्वरित 27 हजार हेक्टरवर पंचनामे अद्यापही अपूर्ण आहेत़ यासाठी तीन विभागाचे   कर्मचारी सातत्याने फिरूनही पंचनामे पूर्ण   होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े अनेक शेतक:यांनी पिक काढून फेकून दिल्याने पंचनामे होणार कसे, असा प्रश्न आह़े या शेतक:यांना शासनाने हेक्टरी भरपाई देण्याची आवश्यकता आह़े उशिराने पंचनामे सुरू करणा:या शासनाने कापूस   काढून फेकणा:या बोंडअळीग्रस्त शेतक:यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी होत आह़े शासनाकडून कोरडवाहू कापूस उत्पादकास बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपये, अशी एकूण 30 हजार 800 रुपये इतकी हेक्टरी मदत देण्याचे जाहिर केले आह़े तर  बागायत कापूस उत्पादक शेतक:यांना एनडीआरएफमार्फत  13 हजार 500, पीक विमा 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपये, अशी एकूण साधारण 37 हजार 500 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतक:यास देण्याचे जाहिर केले आह़े दोन हेक्टर्पयतच ही मदत देण्यात येणार आह़े ही मदत उत्पादनापेक्षा तोकडी असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े