शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डय़ूटी पूर्ण केल्यावरही कुटूंबापासून दुरावाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयासह  सात ठिकाणचे क्वारंटाईन कक्ष, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयासह  सात ठिकाणचे क्वारंटाईन कक्ष, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवक आणि सेविका यांचे जीवन कोरोनामुळे  खडतर बनले आह़े आपल्यातून कुटूंबाला कोरोनाचा संसर्ग होवू नये  म्हणून हे लढवय्ये घरी पोहोचल्यानंतर कुटूंबापासून किमान एक ते दीड तास विलगच राहत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आह़े जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षावर दर दिवशी चार वैद्यकीय अधिका:यांचे पथक नजर ठेवून आह़े दर आठ तासांनी या पथकाची डय़ूटी बदलत असली तरी सर्व अधिकारी किमान 16 तासांर्पयत कक्षावर लक्ष ठेवून आहेत़ सोबत नंदुरबार, नवापुर, आमलाड ता़ तळोदा, खापर ता़ अक्कलकुवा, शहादा, धडगाव, म्हसावद येथील कक्षांचा दैनंदिन कारभार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांची नियुक्ती आह़े किमान 10 तासांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणारे हे कर्मचारी घरी गेल्यावरही त्यांना जादाचा एक तास द्यावा लागत आह़े यात प्रामुख्याने स्वत:ची स्वच्छता केल्यानंतर कपडे धुऊन मग घरात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आह़े घराबाहेर 10 किंवा त्यापेक्षा अधिक काळ बाहेर राहून आल्यानंतर घरी आल्यावरही कुटूंबासोबत एक ते दीड तास वेगळे राहण्याची वेळ येत असली तरी हे ही कुटूंबासाठीच अशी भूमिका घेत हे लढवय्ये दुस:या दिवसाचे नियोजन करतात़ दरम्यान आमलाड ता़ तळोदा येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा 40 खोल्यांचा क्वारंटाईन कक्ष यापूर्वी तयार करण्यात आला आह़े या कक्षासह तळोदा तालुक्याची जबाबदारी सांभाळणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना हा संसर्गजन्य आजार सगळ्यांसाठी घातक आह़े यामुळे त्याच्यासोबत लढा देणे हे सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचा:यांचे आद्य कर्तव्य आह़े घरी गेल्यानंतर बाहेरच सर्व तयारी केले जात़े बाहेरच अंघोळ, स्वत:चे कपडे स्वत: धुणे ते वाळत घालणे ही कामे रात्री कितीही उशिर झाला तरी करावी लागतात़ मुलं लहान असल्याने जवळ येण्याचा हट्ट करतात़ परंतू कुटूंबापेक्षा कर्तव्य निश्चितच मोठं आह़े कोरोनाच्या विलगीकरण कक्षासह रुग्णालयाचे कामकाज साभांळणा:या मुख्य अधिसेविका निलिमा वळवी यांनी सांगितले की घरी पोहोचल्यावर सॅनेटायझरने हात पाय स्वच्छ केल्यावर कुटूंबापासून लांब ठेवत़े   एक तास स्वत:ची स्वच्छता व त्यानंतर कपडे धुवून त्यांना वाळत घालून पुन्हा सॅनेटायझर लावून मग दोन्ही मुलींसोबत संपर्क करत़े दोन्ही मुली लहान असल्याने त्या आधी जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या परंतू कोरोना काय आहे अशी समज दिल्यानंतर त्या माघारी फिरल्या़ सकाळी साडेसात ते रात्री किमान 9 र्पयत कर्तव्य करुन घरी गेल्यावरही हे सर्व करत असताना मुली कधी झोपून जातात़ परंतू सर्वानीच याप्रकारे काळजी घेतल्यास नंदुरबार जिल्ह्यात कोरोना कधीही शिरकाव करु शकणार नाही़ आपण कोरोनाला नक्की हरवू़ जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथकातील 24 अधिकारी क्वारंटाईन कक्षावर लक्ष ठेवून आहेत़ रुग्णालयात तब्बल 92 परिचारिका आहेत़ त्यांच्याकडून क्वारंटाईन कक्षासोबतच गर्भवती मातांचा कक्ष आणि इतर कामकाजावर भर देण्यात येतो़ शिफ्ट डय़ूटीजमध्ये कामकाज होत असले तरीही ब:याचवेळा उशिर होत असल्याने निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सेवा द्यावी लागत़े  रुग्णालयात परिचारिक, सेवक आणि कर्मचा:यांच्या मदतीने चार दिवसात 50 खाटा असलेला नवीन कक्ष तयार झाला आह़े यामुळे आता येथे 100 खाटांचा कक्ष केवळ कोरोनासाठी सज्ज आह़े नियुक्त असलेले सर्वच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी एकमेकांना सहकार्य करत कामांमध्ये मदत करुन कोरोनाला थोपवण्यासाठी मेहनत घेत आहेत़ तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यासाठी नोडल अधिकारी डॉ़ प्रिती पटले यांनी सांगितले की, मुलगी केवळ तीन वर्षाची आहे, ती जास्त वेळ लांब राहू शकत नाही़ परंतू कुटूंबातील सर्वच तीची काळजी घेत असल्याने आता अडचणी येत नाहीत़ परत आल्यावर मात्र ती जवळ येण्याचा प्रयत्न करत़े तरीही किमान एक तास बाथरुममध्ये स्वत:ला कोंडून घेत स्वच्छतेला महत्त्व देत़े हा दररोजचा अनुभव आह़े कोरोनाला थोपवण्यासाठी हे करावेच लागेल़