शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

64 टक्के पाऊस होऊनही प्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:27 IST

लघु व मध्यम प्रकल्प : केवळ 31 टक्के पाणीसाठा, दोन प्रकल्प मात्र ओव्हरफ्लो

ठळक मुद्दे विरचक प्रकल्पालाही पाण्याची प्रतिक्षा.. नंदुरबारला पाणी पुरवठा करणा:या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात अद्यापही पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात या प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीत केवळ 39.48 टक्के पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम

ऑनलाईन लोकमतदिनांक 17 ऑगस्टनंदुरबार : जिल्ह्यात 64 टक्के पाऊस होऊनही लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये निम्मेही पाणीसाठा होऊ शकला नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रकल्पातील पाणी सोडून देण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नवापूर व शहादा तालुक्यात पावसाने अद्यापही पन्नाशी गाठली नसल्याची स्थिती आहे.         जिल्ह्यात यंदा पावसाचे उशीराने आगमन झाले. परिणामी जूनची सरासरी पुर्ण होऊ शकली नव्हती. जुलैमध्ये ब:यापैकी पाऊस झाला. ऑगस्टचा पहिला आठवडाही मध्यम स्वरूपाचा पावसाचा होता. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी 64 टक्केर्प्यत गेली असली तरी अद्यापही अनेक भागात दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. आतार्पयत सर्वाधिक पाऊस हा धडगाव व तळोदा तालुक्यात नोंदविण्यात आला आहे. तर सर्वात कमी पाऊस शहादा तालुक्यात सरासरी 49 तर नवापूर तालुक्यात 50 टक्के झालेला आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्यापही समाधानकारक झालेला नाही. 37 लघु व चार मध्यम प्रकल्प मिळून केवळ 30.88 टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पांना अद्यापही पाण्याची प्रतिक्षा कायम आहे.लघु प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील 37 पैकी 10 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. या प्रकल्पांमध्ये दहा टक्केच्या आतच पाणीसाठा आहे. 20 प्रकल्पांमध्ये 50 ते 60 टक्के व सात प्रकल्पांमध्ये त्यापेक्षा अधीक पाणीसाठा झालेला आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील प्रकल्प सर्वाधिक कोरडे आहेत. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा झालेला आहे. मध्यम प्रकल्पजिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दरा व रंगावली प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर शिवण प्रकल्पात केवळ 39 टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात 61 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे गेल्या आठवडय़ात उघडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा नव्हता. आता नदी प्रवाही असली तरी पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. त्याची दखल घेत पाटबंधावे विभागाने गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही बॅरेजचे गेट बंद केले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच ते सात टक्के पाणीसाठा झालेला आहे.जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 63 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी असली तरी नदी, नाले प्रवाही होऊन त्याद्वारे प्रकल्प भरले गेले नसल्याची स्थिती आहे. जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झालेला पाऊस हा भिज पाऊस होता. त्यामुळे पिकांसाठी त्याचा उपयोग झाला असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यात किंवा प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यात त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात सरासरीचा 78.28, तळोदा तालुक्यात 76.74, अक्कलकुवा तालुक्यात 70.20, नंदुरबार तालुक्यात 62.50, नवापूर तालुक्यात 49.26 तर शहादा तालुक्यात 50.28 टक्के पाऊस झाला आहे.येत्या दीड महिन्यात आणखी पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाची सरासरी टक्केवारी 80 टक्केर्पयत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा दोन वर्षाप्रमाणेच टंचाईची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.