शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ात वाग्देव यात्रोत्सवाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : देवबारा ता़ धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला़ पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या यात्रोत्सवात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव सहभागी झाले होत़े निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणा:या वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : देवबारा ता़ धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला़ पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या यात्रोत्सवात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव सहभागी झाले होत़े निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणा:या वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव-पाडय़ात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवारात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जात़े येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहा मोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा (गुजरात) येथे रवाना होतात़ वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले  धन, धान्य आणि महू यांचा नैवेद्य दाखवला जातो़ हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आह़े धडगाव-शहादा रस्त्यावर धडगावपासून 12 किलोमीटर अंतरावर देवबारा हे गाव आह़े वाग्देवाचे स्थान म्हणून आदिवासी बांधवांमध्ये त्याची ओळख आह़े याठिकाणी महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आह़े सोमवारी सुरू झालेल्या या यात्रोत्सवात पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरूषांनी लक्ष वेधून घेतल़े डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाग्देवाची स्तुतीगिते गात होती़ याठिकाणी रात्री सोंगाडय़ा पार्टीचे आयोजन करण्यात आले होत़े यातही कलांतवंतांनी गीत आणि नाटय़रूपांतर करत वनातील वाघाचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन कसे झाले पाहिजे याबाबत प्रबोधन केल़े आदिवासी समुदायात देवरूप मानल्या गेलेल्या वाघाची दिनचर्याही त्यांनी सोंगाडय़ा पार्टीद्वारे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली़ देवबारा येथील यात्रोत्सवानंतर सातपुडय़ाच्या कानाकोप:यातील यात्रोत्सवांना सुरूवात होत़े गावोगावी वाग्देव पूजनाचे कार्यक्रमही घेण्यात येतात़ महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे यात्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या दिसून येत आह़े