शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

अखेर जखमी मोराला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अलिकडे धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मााणसाला माणसांकडेच लक्ष द्यायला पुरेसा वेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अलिकडे धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मााणसाला माणसांकडेच लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. या स्थितीत माणसाला माणूस म्हणून मदत करण्याची प्रवृत्तीही नष्ट होत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जखमी पक्ष्याची वेदना लक्षात घेऊन अक्कलकुवा येथील कार्यकर्त्यांनी जखमी मोराला जीवनदान दिल्याची घटना नुकतीच घडली.कोरोनाच्या काळात अनेक दिवसानंतर लोकांना थोडा निवांत वेळ मिळाला. या काळात अनेकांमध्ये पशु पक्षी व निसर्गावरील प्रेमही बहरले. कोरोनाच्या संकट काळात पशु पक्षी व प्राण्यांनीही लोकांचे मनोरंजन केले व लळा लावला. असाच प्रकार अक्कलकुवा येथे झाला. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराने अक्कलकुवा शहरातील नागरिकांचे मन मोहक मनोरंजन केले. वरूण राजाच्या बरस्त्या सरीत आपला सप्तरंगी पिसारा फुलवून शहरातल्या अनेक गल्ली बोळांमधून नाचत आबाल वृद्धांचे डोळ्याचे पारणे फेडले. त्यामुळे संपूर्ण शहरात या मोराने लोकांना लळा लावला. अनेक दिवसापासून लोकांना त्याला नियमित पाहण्याची जणू सवयच झाली आहे.मानवा प्रमाणे प्राण्यांनादेखील काही दुखापती होतात आणि त्यामुळे ते ही वेदनांनी विव्हळतात. आपल्या मनोहारी नृत्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या पक्षाच्या या नृत्य सम्राटालादेखील एका दुखापतीने ग्रासले. हा मोर जखमी अवस्थेत विव्हळत निपचित पडल्याचे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांना दिसला. यानंतर त्यांनी ताबडतोब रवींद्र गुरव यांना मोराच्या जखमी अवस्थेची माहिती दिली. या मोराच्या पंखामध्ये खोलवर जखम झाली होती. मोराच्या जखमी अवस्थेचे गांभिर्य लक्षात घेऊन गुरव त्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेकानंद बाळापुरे, डॉ.ज्योती बाळापुरे, सोरापाडा येथे राहत असलेले डाब येथील पशुवैद्यकीय परिचर नरेंद्र सोनवणे व गव्हाली येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.व्ही.एस. होंडे यांना माहिती देत कोटलाफळी येथे मोरावर उपचार करण्यासाठी पाचारण केले.डॉ.विवेकानंद बाळापुरे, ज्योती बाळापुरे, पशुधन पर्यवेक्षक व्ही.एस. होंडे, परिचर नरेंद्र सोनवणे हे तातडीने कोटला फळी येथे येऊन जखमी मोरावर तातडीने उपचार व मलम पट्टी केली. तत्काळ झालेल्या उपचारांनी जखमेच्या वेदनांनी विव्हळणाºया मोराला जीवदान मिळाले. मानवावर उपचार करणारे डॉक्टर व पशुंवर उपचार करणारे डॉक्टर एकाच वेळी एका पक्ष्यावर उपचार करताना दिसले. यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय होता. एकंदरीत कोरोनाच्या संकट काळात काही ठिकाणी डॉक्टर माणसावर उपचार करत नाही. तेव्हा एकाच वेळी पक्षी व प्राण्यावर उपचार करणाºया या डॉक्टरांचे कर्तव्य व माणुसकी इतरांच्या मनाला सुखावणारी होती. या वेळी कोटला फळीतील तुषार पाडवी यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.