शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठीच्या सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:45 IST

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त भरारी पथक. कर्मचारी व साहित्य घेवून जाणारी वाहने, सहाय्यक ...

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त भरारी पथक. कर्मचारी व साहित्य घेवून जाणारी वाहने, सहाय्यक खर्च नियंत्रण निरक्षक आणि राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याद्वारे नियंत्रण कक्षातून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.पथकांचे काम अधिक कार्यक्षमपणे व्हावे आणि त्यांच्या कामकाजात पारदर्शकता रहावी यासाठी एकूण ३४ वाहनांवर जीपीएस यंत्रणा यापूर्वीच बीएसएनएलच्या सहकार्याने बसविण्यात आली आहे. याशिवाय दुर्गम भाग आणि दुरवरच्या अंतरावर कर्मचारी आणि निवडणूक साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांनावर देखील जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील चार भरारी पथकांच्या वाहनांवर, उत्पादन शुल्क विभागाच्या चार वाहनांवर आणि सहाय्यक खर्च निरीक्षक पथकाच्या सहा वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. भरारी पथकाद्वारे निवडणुकीत पैसे आणि वस्तुंची देवाण-घेवाणीसोबत आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष दिले जात आहे.अवैध दारूचा निवडणुकीत होणारा उपयोग रोखण्यासाठी उत्पादनशुल्क विभागाची पथके २४ तास कार्यरत आहेत. सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या पथकाद्वारे विविध रॅली-सभा व इतर माध्यमातून निवडणुकीत होणाºया खर्चाबाबत माहिती संकलीत करण्यात आली आहे.मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, जीपीएस यंत्रणेमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार संघातील विविध भागावर लक्ष ठेवण्याबाबत योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.जीपीएस प्रणालीमुळे वाहनाचे निश्चित ठिकाण कळण्यास मदत होत असल्याने पथकाचे कामकाज पारदर्शक होण्याबरोबरच आवश्यकतेनुसार पथकाला सूचना देणे शक्य झाले आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे स्वत: जिल्ह्यात विविध ठिकाणी भरारी पथकांना भेट देवून पथकाच्या कामकाजाची पाहणीदेखील केली आहे.