शहादा : शहरातील टिळक चौकातील कोलकत्ता येथील बादशाह बंगाली यांनी माणुसकीचा धर्म जपत शेजारी राहणाऱ्या भिकाजी लक्ष्मण पिंपळे (वय ८०) या ब्राम्हण वॄद्धाला अग्नी दिला. या माणुसकीच्या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील टिळक चौकात बादशाह बंगाली गेल्या २२ वर्षांपासून वास्तव्याला असून, तो सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत आहे. मयताची बहीण आशा भालचंद्र भट यांच्याशेजारी बादशाह बंगाली हे वास्तव्याला आहेत. भिकाजी लक्ष्मण पिंपळे यांना मुलंबाळं नसल्याने त्यांनी त्याची मुलाप्रमाणे देखभाल केली. भिकाजी भट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अपत्य नसल्याने पिंपळे व भट कुटुंबासमोर अग्निदाग देण्याचा प्रश्न होता. बादशाह बंगाली याने माणुसकीचा धर्म जपत अग्नी देण्यासाठी पुढाकार घेऊन भट यांना अग्नी देत समाजासमोर आदर्श उभा केल्याने बादशाह बंगालीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
बादशाह बंगालीने माणूसकी जपत ब्राम्हण व्यक्तीला दिला अग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST