शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

कवळीथ येथील बंधाऱ्याची दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधाºयाच्या संरक्षक भिंतीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. या बंधाºयाचा दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधाºयाच्या संरक्षक भिंतीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. या बंधाºयाचा दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष लाभ होत असतो. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असल्याने बंधाºयाची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी दिल्या.आमदार पाडवी यांनी शुक्रवारी कवळीथ येथील बंधाºयाला भेट देऊन पाहणी केली. गेल्यावर्षी हा बंधारा नादुरुस्त झाला असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी यापूर्वी आमदार पाडवी यांच्याकडे केल्या होत्या. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे या बंधाºयाच्या कालव्याची संरक्षक भिंत पडून गेल्याने गोमाई नदीचे पाणी कालव्यात वळवता आले नाही. त्यामुळे हा कालवा बंद पडला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे ही भिंत त्वरित दुरूस्त करण्यात यावी, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. संबंधित यंत्रणेला अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हा नियोजन किंवा इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून कालवा सुरु करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, योगेश पाटील, खेडदिगरचे संरपच अविनाश मुसळदे, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, पाटबंधारे विभागाचे अभियंता एम.बी. पाटील, मोहिदाचे संरपच गिरधर पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, ईश्वर पाटील, गोगापूरचे संरपच विजय सोनवणे, भागापूरचे संरपच निलेश पाटील, कवळीथचे संरपच योगेश पाटील आदी उपस्थित होते.