शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भोंगरा येथील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील भोंगरा येथे मोठय़ा प्रमाणावर बिनधास्तपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करून गावात दारूबंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील भोंगरा येथे मोठय़ा प्रमाणावर बिनधास्तपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करून गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी गावातील महिलांनी एकत्र येत शहादा येथे तहसीलदार मनोज खैरनार व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांची भेट घेऊन दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन दिले.शहादा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर मंदाणे गावाच्या पुढे दोन हजार 200 एवढी लोकसंख्या असलेल्या भोंगरा  गावात मोठय़ा प्रमाणावर अवैधपणे गावठी दारू पाडून विक्री होत आहे. त्यासोबतच विविध प्रकारच्या विदेशी दारू गावात राजरोसपणे विक्री होत असल्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या व दारूच्या आहारी लागल्याने बरबाद होत आहे. दारूचे व्यसन लागल्याने तरुणांचे शिक्षण व कामधंदा याकडे लक्ष न लागता फक्त दारूच्या मागे ते लागले आहेत. भोंगरा गावात अवैधपणे दारू पाडून सुमारे 65 टक्के लोक दारूच्या व्यवसाय करीत आहेत. या गावठी दारूमुळे 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलेदेखील दारूच्या आहारी गेले आहेत. गावात दारूचे व्यसन असलेले तरुणांचा मृत्यू झाल्यान तरुण मुली विधवा झाल्या आहेत. गावात दारूबंदी करावी या आशयाचे निवेदन अनेकदा पोलीस व संबंधित प्रशासनाला देऊनही त्यांच्या वतीने गावात अवैध दारू विक्री करणा:यांवर काहीच कारवाई का होत नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडल्याने गावातील महिलांनी एकत्र येत शहादा गाठून पोलीस व तहसीलदारांसमोर दारूबंदी करण्यासंदर्भात आपले म्हणणे मांडले.भोंगरा परिसरातील मंदाणे, वडगाव, चांदसैली, घोडलेपाडा, भुलाणे या गावांमध्ये कडक दारूबंदी करण्यात आली आहे. या गावांमध्ये दारू मिळत नसल्याने या गावांमधील लोक भोंगरा येथे दारू घेण्यासाठी येतात. यामुळे भोंगरा गावात मोठय़ा प्रमाणावर गावठी दारूचा व्यवसाय केला जात असून गावात अशांतता पसरते. घराघरांमध्ये व गल्लीबोळात नेहमी वादविवाद सुरू असतात. यात महिलांनादेखील मारहाण केली जाते. गावात दारूबंदीसाठी आवाज उठवणा:या लोकांचाही आवाज दाबला जातो. सोमवारी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदन देण्यासाठी येणा:या महिलांनाही धमकावून काढण्याचा प्रकार झाला. म्हणून या दारू विक्री करणा:यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक तरी आहे का? हे  यावरून दिसते.संबंधित प्रशासन व  पोलीस निरीक्षक यांना याआधी वारंवार निवेदन दिले आहे. सोमवारीही निवेदन दिले असून आता गावात कारवाई करून दारूबंदी न झाल्यास ग्रामस्थ व महिलांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करून येणा:या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रमिलाबाई पानपाटील, अंजनाबाई पानपाटील, चंदनबाई पवार, बेबाबाई इंगळे, लताबाई पानपाटील, रंजनाबाई पानपाटील, संगीताबाई इंगळे, गंगाबाई पावरा, प्रमिला पावरा, सुमन पावरा, प्रमिला पावरा, बाईशी पावरा, नीलम पावरा, राब्याबाई पावरा, मदन पावरा, मनीषा पावरा हिरा वळवी, मनोज चव्हाण आदींच्या सह्या आहेत.