शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीमुळे इतरांचेही होताय हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:58 IST

शेतक:यांची वीजजोडणी खंडीत : पिकांना पाणी देणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांच्या  कृषी पंपाचे थकित  वीज बिलासाठी आता थेट विद्युत रोहित्रावरील विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आह़े  मात्र, या कारवाईमुळे नियमीत बील भरणा:या शेतकरींना झळ बसत आह़े पाण्याअभावी पीके करपत आहेत़ या प्रकरणी महावितरणच्या वरीष्ठ अधिका:यांनी दखल घेण्याची शेतक:यांची मागणी आह़ेतळोदा तालुक्यात साधारण पावणे सहा हजार कृषी पंप धारक शेतक:यांची संख्या आहे. या सर्व कृषी पंपधारक शेतक:यांना येथील वीज वितरण कंपनीकडून  वीजपुरवठा दिला आह़े तथापि यातील जवळ जवळ 5 हजार 500 शेतक:यांकडे या विभागाचे 46 कोटी रुपयांचे विज बिल गेल्या अनेक वर्षांपासून थकले आह़े या थकित बिलांसाठी महावितरणतर्फे अनेक वेळा सूचना दिल्या आहेत़ परंतू शेतकरी बील भरण्याबाबत सकारात्मकता दाखवत नाही़ परिणामी महावितरण कंपनीने त्यांच्या कृषी पंपाच्या जोडण्या कट केल्या आहेत़ तरीही थकबाकीदार शेतकरी पुन्हा केबल टाकून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता थेट कृषी पंपाला विजपुरवठा करणारे विद्युत रोहित्रच बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आह़े आता पावेतो जवळपास 70 विद्युत रोहित्र बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित विज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकारीने दिली आहे. थकबाकीदार शेतक:यांचा वीजपुरवठा कंपनीने खंडित केला असला, तरी त्याची झळ नियमीत वीज बिल भरणा:या शेतक:यांनादेखील बसत आह़े कारण खंडित पुरवठामुळे पिकांना पाणीही देता येत नसल्याने पिक जगविण्यासाठी शेतक:यांना मेहनत घ्यावी लागत आह़े दरम्यान, शेतक:यांचा रब्बी हंगाम सुरु झाला आहे. या हंगामतील गहु, हरभरा, रबी ज्वारीची पेरणी करण्यासठी लगबग सुरु झाली आहे त्यासाठी सुरुवातीला कोरडे झालेले क्षेत्र भिजवावे लागते मात्र पाणी अभावी क्षेत्र तसेच पडले आह़े वीज मंडळाच्या आडमुठेपणामुळे या पेरण्या लांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या शिवाय पाणी अभावी केळी, पपई, ऊस ही पीकेही करपत  आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतलब झाला आहे. आधीच सततच्या भारनियमनामुळे जसे-तसे पिक वाचविलेत तसेच परतीच्या पावसाने केलेले मोठे नुकसान याने शेतक:यांची पूर्ण कंबर मोडली गेली आह़े जेमतेम रब्बी हंगामावर आता शेतक:यांचे लक्ष केन्द्रीत झाले असतांना वीज वितरण कंपनीने थकित बिलांसाठी तगादा लावला आह़े साहजिकच शेतकरी मेटाकुटीला आला असल्याची व्यथा आह़े निदान वीज खात्याच्या मंत्र्यांनी शेतक:यांची विदारक अवस्था लक्षात घेवून वीज वितरण कंपनीने हाती घेतलेली कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या मोहीमेला मार्च-एप्रिल र्पयत स्थगिती द्यावी अशी शेतक:यांची मागणी आह़़े  अन्यथा या विरोधात शेतक:यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आह़े