नंदुरबार : शहादा तालुक्यातील कवठळ शिवारातून ईलेक्ट्रीक मोटार व पाईप चोरीला गेल्याची घटना २ एप्रिल रोजी घडली होती़ चोरीमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून परिसरात अशा घटना वाढत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़कवठळ येथील विनोद जाधव चौधरी यांच्या मालकीच्या शेतात २२ हजार ५०० रुपये किमतीची मोटार व १२ पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ १ आणि २ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाईपांसकट मोटार चोरुन नेली़ शेतकरी चौधरी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली़ त्यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़
कवठळ शिवारातून ईलेक्ट्रीक मोटारची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:52 IST