शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापपूर परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 12:37 IST

महावितरणचे दुर्लक्ष : सबस्टेशनवरील अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी

भारतसिंग गिरासे । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 9 : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील वीज वितरण कंपनीच्या 33/11 क़ेव्ही़ सबस्टेशनवर वाढीव विद्युत भार जाणवत आह़े त्यामुळे याला जोडून असणा:या मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमध्ये वीजेचा सतत लपंडाव सुरु असतो़ त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आह़े नवीन कार्यान्वित करण्यात आलेले तलावडी व मोरवड या सबस्टेशनवर काही रोहित्रांचा भार टाकून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी प्रतापपूर परिसरातील ग्रामस्थांकडून होत आह़ेप्रतापपूर विद्युत सबस्टेशनअंतर्गत प्रतापपूर, रांझणी, राणीपुर, रोझवा, प्रतापपूर या गावांचा समावेश होत असतो़ विद्युत वितरणचे सहा फिडर कार्यान्वित असून पैकी, प्रतापपूर व रोझवा हे दोन फिडर क्षमतेपेक्षा अधिक वीज भार सहन करीत असल्याची माहिती आह़े त्यामुळे हे दोन्ही फिडर कुचकामी ठरत असतात़ परिणामी भारनियमनाव्यतिरिक्त तासन्तास वीज गुल होत  असत़े आधिच परिसरात मोठय़ा प्रमाणात तापमान जाणवू लागले आह़े त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आह़े शेतामध्ये ऊस, केळी, पपई, टरबूज, मका आदी पिकाला पाणी देणे कसरतीचे ठरत आह़े वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे  ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातील बोरद, सोमावल, प्रतापपूर, तळोदा या सबस्टेशन वरील अतिरिक्त विद्युत दाबामुळे शासनाकडे आमदार उदेसिंग पाडवी यांच्या प्रयत्नाने मोदलपाडा, तलावडी, मोरवड हे सबस्टेशन मंजूर करुन कार्यान्वित करण्यात आले होत़े तसेच बोरद सबस्टेशन येथे 5 एम़व्ही़ क्षमतेचा एक वाढीव विद्युत रोहित्रसुध्दा कार्यान्वित करण्यात आला होता़ मात्र प्रतापपूर येथील सबस्टेशन वरील ताण कमी करण्यात आलेला नाही़ त्यामुळे परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’ आह़े नवीन सबस्टेशनवर इतर गावांच्या वीजेचा भार टाकत वीज पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आह़े प्रतापपूर सबस्टेशवरुन सातपुडय़ाच्या पर्वत रांगावरील गावांना 15 ते 20 किलामीटर र्पयत वीजवाहिन्या पुरविण्यात येत असतात़ या अतिरिक्त ताणामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारीसह जनमित्रांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत़े तरी संबंधित अधिका:यांनी त्वरीत वीज व्यवस्था सुरळीत करुन शेतक:यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रतापपूर परिसरातील नागरिकांनी केली आह़े अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आह़े