लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरटय़ांनी वीजेची तारसह थेट पोलच चोरून नेल्याची घटना कोरीट शिवरात 10 रोजी घडली. अशा प्रकारे चोरी करणा:या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली असून पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. शेत शिवारातून विजेच्या पोलवरून थेट तारा कापून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज पुरवठा सुरू असतांना अशा प्रकारच्या चोरीची हिंमत चोरटय़ांकडून केली जात आहे. यामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. कोरीट शिवारात नुकतीच चोरटय़ांनी अशा प्रकारे चोरी केली. तब्बल तीन हजार फूट लांबीची अल्युमिनियमची तार कापून नेली. शिवाय थेट तीन लोखंडी पोल उखडून नेले. त्यांची एकुण किंमत 25, 198 रुपये इतकी आहे. याबाबत खोंडामळी उपकेंद्राचे अधिकारी भास्कर नथ्थू पाटील यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहेत. यामुळे बागायती कापूस लागवड करणा:या आणि इतर पिकांना पाणी देण्यासाठी आता शेतक:यांची कसरत होणार आहे. नवीन पोल उभारणे, तारा टाकणे याला मोठा कालावधी लागणार आहे. शेतकरी हैराण झाले आहेत.
वीज तारांसह थेट पोलही उखडून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:53 IST