शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिका निवडणुकीत आजी-माजी सदस्य रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगराध्यक्षांसह 11 विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यात दहा काँग्रेसपक्षातर्फे तर एक सदस्य भाजपतर्फे उमेदवारी करीत आहेत. याशिवाय दोघांपैकी एका सदस्याने प}ीला तर एकाने प}ीऐवजी स्वत:कडे उमेदवारी घेतली आहे. दरम्यान, यंदा आजी-माजी एकुण 23 नगरसेवक यंदा निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे. अर्थात माघारीअंती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगराध्यक्षांसह 11 विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यात दहा काँग्रेसपक्षातर्फे तर एक सदस्य भाजपतर्फे उमेदवारी करीत आहेत. याशिवाय दोघांपैकी एका सदस्याने प}ीला तर एकाने प}ीऐवजी स्वत:कडे उमेदवारी घेतली आहे. दरम्यान, यंदा आजी-माजी एकुण 23 नगरसेवक यंदा निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे. अर्थात माघारीअंती चित्र स्पष्ट होणार आहे.नंदुरबार पालिकेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्यामुळे दोन्ही पक्षांतर्फे निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांनाच तिकिटे देण्यात आली आहेत. त्यासाठी काही प्रभागात जवळच्या कार्यकर्ते किंवा नेत्यांची नाराजीही संबधित नेत्यांना ओढवून घ्यावी लागली आहे. आता माघारीर्पयत अशा नेत्यांची मनधरणी किंवा त्यांचे रुसवे-फुगवे काढावे लागत आहेत. माघारीअंती चित्र स्पष्ट होणार असले तरी पक्षातर्फे देण्यात आलेल्या ए.बी.फॉर्मच्या आधारे काँग्रेस व भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.काँग्रेसतर्फे सर्वाधिककाँग्रेसतर्फे विद्यमान व माजी नगरसेवक किंवा त्यांच्या पत्नी अथवा पतीला उमेदवारी देण्याकडे पक्षाचा कल राहिला आहे. चालू पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचे 37 पैकी 36 नगरसेवक होते. त्यातील एका नगरसेवकाने भाजपकडून उमेदवारी मिळविली आहे. इतर दहा जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी करणा:या विद्यमान सदस्यांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी, नगरसेवक कश्मिरा बोरसे, किरण रघुवंशी, कुणाल वसावे, दिपक दिघे, परवेजखान करामतखान, शिलाबाई रमेश कडोसे, राजेंद्र माळी, भारती अशोक राजपूत, कलावती वरत्या पाडवी, संजय चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय रवींद्र मराठे यांच्याऐवजी त्यांच्या प}ी सुरेखा मराठे तर वंदना पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पती कैलास पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी नगरसेवकांचा देखील मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. भाजपने देखील दिली उमेदवारीभाजपतर्फे देखील अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने देखील अत्यंत सावध पवित्रा घेत उमेदवारांची निवड केली आहे. त्यात विद्यमान सदस्य ईश्वर जयराम चौधरी, माजी नगरसेवक श्याम मराठे, चारुदत्त कळवणकर आदींचा समावेश आहे. याशिवाय निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांचा शोध घेवून त्यांना उमेदवारी देण्याकडे कल आहे. माघारीअंती सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.अपक्षांचीही उमेदवारीयंदा अपक्षांचीही मोठय़ा प्रमाणावर उमेदवारी राहण्याची शक्यता आहे. माघारीर्पयत कोण रिंगणात बाहेर पडतो त्यावर देखील बरेच काही अवलंबून राहणार आहे. नगराध्यक्षपदासाठी चार अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय नगरसेवकपदासाठी देखील मोठय़ा प्रमाणावर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.माघारीकडे लक्षशनिवारी दाखल अर्जाची छाननी केल्यानंतर सोमवारपासून अर्ज माघारीस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज माघारी झाली नाही. मंगळवारी मात्र, नंदुरबारसह तळोदा व नवापूरात देखील उमेदवारांनी माघार घेतली. ज्या प्रभागात अपक्षांची डोकेदुखी आहे अशा प्रभागातील संबधीत उमेदवारांना माघार घेण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब केला जात आहे. माघारीच्या अंतिम दिवशी अर्थात 30 रोजी त्यातील कितीजण माघार घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.