शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

20 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू : शहादा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 24 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रमास सुरूवात झाली आह़े शनिवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी शहादा तहसील परिसर गजबजला होता़  तालुक्यातील धांद्रे बुद्रुक, पाडळदा ब्रुद्रुक, कमरावद, बिलाडी तर्फे सारंगखेडा, बुपकरी, श्रीखेड, भोरटेक, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद तर्फे सारंगखेडा, कळंबू, ओझर्टा, परिवर्धे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या 24 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रमास सुरूवात झाली आह़े शनिवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी शहादा तहसील परिसर गजबजला होता़  तालुक्यातील धांद्रे बुद्रुक, पाडळदा ब्रुद्रुक, कमरावद, बिलाडी तर्फे सारंगखेडा, बुपकरी, श्रीखेड, भोरटेक, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद तर्फे सारंगखेडा, कळंबू, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, मंदाणे व कानडी तर्फे हवेली या 20 गावांमध्ये 24 ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त असल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आह़े गत निवडणूकीत नामनिर्देशन दाखल न झाल्याने, सदस्यांनी राजीनामा दिल्याने तसेच एक सदस्य मयत झाल्याने ही पदे रिक्त झाली होती़ शुक्रवार सायंकाळर्पयत मंदाणा, कळंबू आणि कानडी तर्फे हवेली या तीन ग्रामपंचायतींसाठी तीनच अर्ज दाखल झाले होत़े शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आह़े सोमवारी 12 फेब्रुवारी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येऊन 15 फेब्रुवारीर्पयत उमेदवारांना अर्ज माघारी घेत येणार आहेत़ या 20 ग्रामपंचायतींसाठी 25 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या निवडणूकांसाठी मंडळ अधिकारी एस़ जी़परदेशी, आऱएऩशिंपी, प्रशांत देवरे, जी़बी़धाकड, एस़जी़ वाडेकर, पी़टी़गिरासे, एस़जी़ शिरसाठ, बी़ओ़पाटील यांची नियुक्त करण्यात आली आह़े