शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार संवर्गातील 451 सहकारी संस्थांचा निवडणूकांचा मार्ग माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम रखडलेल्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम रखडलेल्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून अ, ब, क आणि ड संवर्गातील एकूण ४५१ सहकारी संस्थांमध्ये निवडणूक कार्यक्रम येत्या काळात होणार आहे. यात जिल्ह्यातील दोन सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.यात जिल्ह्यातील दोन सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या नियमावलीनुसार जिल्ह्यात सहकारी संस्थांचा दर्जा ठरवण्यात आला आहे. यात अ दर्जाच्या संस्थांमध्ये साखर, वस्त्रोद्योग, दुग्ध आदींचा समावेश करण्यात आला आहे. कोविडमुळे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या क दर्जाच्या १८ तर ड दर्जाच्या ९ अशा ३० संस्थांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील बंदी उठवल्याने त्यांच्याकडून निवडणुकांना जेथून प्रक्रिया थांबली होती तेथून सुरुवात होणार आहे.प्रामुख्याने गृहनिर्माण, विविध कार्यकारी संस्था, साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, दुग्धोत्पादन सोसायट्या, विविध कार्यकारी संस्था, खरेदी विक्री संघ आणि बाजार समित्या यांचा यात समावेश आहे. बाजार समित्यांबाबतचा निवडणुकीचा निर्णय मात्र जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याकडेही लक्ष लागून राहणार आहे. 

निवडणूकांसाठी खर्चाचा प्रश्न निवडणूकांचे अद्याप वेळापत्रक आलेले नसले तरी सहकारी संस्थांच्या प्रशासनाला वेगळीच चिंता सतावत आहे. निवडणूकीस पात्र असलेल्या संस्था ह्या अत्यंत तुटपुंज्या अशा भांडवलावर चालतात. यातून गेल्या वर्षात कोविड आणि लाॅकडाऊन यामुळे यातील अनेक संस्थांना फटका बसला आहे. परिणामी निवडणूकांसाठी लागणारा खर्चाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

  २०१९ च्या पात्र संस्था  दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या एकूण १२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात क दर्जाच्या १४ तर ड दर्जाच्या ११४ सहकारी संस्थांचा समावेश आहे. कोरोनामुळे जानेवारी २०२० ते मार्च २०२० या काळात मुदत संपलेल्या एकूण १७५ संस्था निवडणूक कार्यक्रमास पात्र होत्या. यात ब दर्जाच्या १०५, क दर्जाच्या ३६, ड दर्जाच्या ३४ संस्था समाविष्ट आहेत.

  २०२० च्या पात्र संस्था जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२० या काळात ४६ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जा असलेली एक, ब दर्जाच्या १८, क दर्जाच्या १३, तर ड दर्जा असलेल्या एकूण ४६ संस्थांचा समावेश आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एकूण ३७ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जाची एक, ब दर्जा २८, क दर्जाच्या ५ तर ड संवर्गातील ३ संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिसेंबरपर्यंत मुदत संपणा-या संस्थांमध्येही निवडणूक : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात ३५ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र ठरणार होत्या. यात ब दर्जा प्राप्त २१, क दर्जा प्राप्त आठ दर ड दर्जा प्राप्त असलेल्या ६ संस्थांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीस पात्र असलेल्या सर्वच सहकारी संस्थांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात अ दर्जा असलेल्या दोन, ब दर्जाच्या १८५, क दर्जाच्या ९४ तर ड दर्जाच्या १७० संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

निवडणूका घेण्यास शासनाने मुभा दिली असली तरी अद्याप सहकार विभागाकडून वेळापत्रक जाहिर केलेले नाही. खरेदी विक्री संघासारख्या संस्था गेल्या वर्षातील कोरोना महामारीमुळे अडचणीत असल्याने शासनाने निवडणूक खर्चाची तरतूद करण्याची अपेक्षा यंदा व्यक्त होत आहे.  -अनिल पाटील,सचिव, खरेदी -विक्री संघ, शहादा.