शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या कुशीतील ‘त्या’ एकलव्यांना मिळाले गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने तिघा मित्रांनी धडगाव परिसरातील ७० खेळाडूंना एकत्रित करीत ‘नवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने तिघा मित्रांनी धडगाव परिसरातील ७० खेळाडूंना एकत्रित करीत ‘नवी उमेद नंदुरबार सातपुडा’ म्हणत उपलब्ध संसाधनांचा वापर करीत मैदानी खेळ व कसरतींचा सराव घेत आहेत. यातून भविष्यातील एखादा गुणी ऑलंम्पिक खेळाडू सातपुड्याच्या कुशीतून तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा क्रीडा विभागाने अशा खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनमध्ये व्यक्तीगत व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक नवे  प्रयोग, प्रयत्न  समोर आले आहेत. असाच एक उमेद देणारा प्रयत्न सुरू  आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये. धनाजे बुद्रुक व तलावडी या गावात तीन अवलिया तब्बल ७० विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. धडगाव तालुक्यात राहणाऱ्या ॲड.छोटू वळवी यांना ही  कल्पना सूचली. त्यांनी ही कल्पना मनोहर पाडवी आणि विलास वळवी या  मित्रांसमोर मांडली.  यातले विलास वळवी हे धुळ्यात क्रीडा प्रशिक्षक आहेत.  या तिघा मित्रांनी धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील गाव-पाड्यांवरील मुलांना एकत्र आणले. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने मुले घरीच होती.  त्यांचा खेळांचा सरावही थांबला होता. धनाजे बुद्रुक, ता.धडगाव येथे  या मित्रांनी ७० मुलांना एकत्र आणले. यात आपापल्या शाळा, महाविद्यालयात विविध क्रीडा प्रकारांमध्ये निपुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक खेळाडू आहेत. त्यांना दुपारी दोन तास पाठ्य पुस्तकातले शिक्षणही  दिले जाते. नंतर खेळाचा सराव.  हा सराव शास्त्रशुद्ध आणि खडतर. कुठलाही मुलाहिजा न बाळगता मुलांकडून  तयारी  करून घेतली जात आहे. यात मुलगा-मुलगी असा भेद नाही.  १५ जूनपासून सुरू  असलेले हे प्रशिक्षण स्वयंप्रेरणा आणि समाजहितासाठी सुरू आहे. या मुलांमध्ये कोणाला पोलीस व्हायचे आहे तर कोणाला जागतिक दर्जाचा धावपटू. साधनसुविधांचा अभाव आहे पण मुलांचा  जोश तसूभरही कमी नाही. लॉकडाऊनमध्येही प्रशिक्षण मिळत आहे याचे या मुलांना समाधान आहे.एकीकडे या मित्रांच्या कामाचे गुणगाण परिसरातील नागरीक करीत असताना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला याची माहिती मिळू नये याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. क्रीडा विभागाने किमान आवश्यक क्रीडा साहित्य या खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.