शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा विळखा वाढत असला तरी तालुक्यातील १८० गावांपैकी आठ गावांमध्ये गेल्या मार्चपासून एकही ...

शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा विळखा वाढत असला तरी तालुक्यातील १८० गावांपैकी आठ गावांमध्ये गेल्या मार्चपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. या गावांनी अद्यापर्यंत कोरोनाला वेशीबाहेर रोखण्याची किमया साधली आहे, तर ८० गावांमध्ये आजच्या स्थितीत एकही बाधित नाही. ७५ गावांमध्ये बाधितांची संख्या ही दहाच्या आत आहे.

देशात कोरोना संक्रमणाचे संकट उद्भवल्यानंतर १८ मार्च २०२० पासून जून महिन्यापर्यंत करण्यात आले होते. असे असताना शहादा शहरात २२ एप्रिल २०२०ला कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढली. कोरोना विषाणूचे संक्रमण थोपविण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गावात औषध फवारणी करणे, आदी उपाययोजना पालिका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आल्या.

तालुक्यात १४७ ग्रामपंचायती अंतर्गत १८० गावांचा समावेश आहे. यापैकी गेल्या मार्च महिन्यापासून तालुक्यातील आठ गावांच्या कारभाऱ्यांनी कोरोना विषाणूला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या १४ महिन्यांच्या कालावधीत शासकीय नियमांचे पालन करून गावातील पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याने कोरोना विषाणूची बाधा गावकऱ्यांनी या आठ गावांत पसरू दिली नाही. वेळोवेळी औषध फवारणी करण्यासह आरोग्य विभागामार्फत गावकऱ्यांची तपासणी करून इतर ठिकाणांहून गावात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना गावात परवानगी दिली जात असल्याने या आठही गावांत कोरोनाचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही.

जानेवारी २०२१ पासून शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले. अनेक गावांमध्ये बाधित मोठ्या संख्येने आढळून आले. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता तालुक्यातील ८० गावं अशी आहेत, तिथे २० मार्चनंतर नव्याने बाधित रुग्ण आढळून आला नाही. परिणामी या गावांमध्ये बाधितांची संख्या शून्य आहे. मध्यंतरीच्या कालावधीत बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या गावात विशेष उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आल्याने या गावांमध्ये सध्यातरी कोरोनाचे संक्रमण नाही.

शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण असले तरी तालुक्यातील ७५ गावांमध्ये अगदी बोटावर मोजता येतील एवढे बाधित रुग्ण सद्य:स्थितीत आहेत. या गावांमध्ये दहापेक्षा कमी बाधित रुग्ण आहेत. पैकी बरेच रुग्ण उपचाराअंती बरे होण्याच्या मार्गावर आहेत.