शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दोन गटातील मारहाणीत आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरासमोर वाहन उभे केल्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत आठजण जखमी झाले. हाणामारीत दोन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घरासमोर वाहन उभे केल्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत आठजण जखमी झाले. हाणामारीत दोन्ही गटांनी तलवार, लोखंडी सळई व लाठय़ाकाठय़ांचा वापर करण्यात आला. नंदुरबारातील घोडापीर मोहल्ला भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनुसार, शेख मुस्तकीन सलीम कुरेशी व सिराऊद्दीन शेख हलवाई यांच्यात घरासमोर वाहन लावण्याच्या वादातून रविवारी रात्री वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दोन्ही गटातर्फे तलवार, लोखंडी सळई, काठय़ांचा वापर करण्यात आला. त्यात दोनजण जखमी झाले. याबाबत रात्री उशीरा शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.शेख मुस्तकीन सलीम कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोर वाहन लावण्याचा वाद उकरून काढत जमावाने शेख मुजम्मील शेख कलीम व इततर दोघांवर हल्ला केला. त्यात कलीमसह आणखी एकजण जखमी झाला. शेख मुस्तकीन सलीम कुरेशी यांच्या फिर्यादीवरून सिराऊद्दीन शेख हलवाई, रफियोद्दीन बिस्मिल्ला हलवाई, अरमान हलवाई, फारूख रफियोद्दीन हलवाई, हारून रशिद हलवाई, राजू रफियोद्दीन हलवाई, शाहरूख रफियोद्दीन हलवाई, सहाबुद्दीन हलवाई, साजिद सिराज हलवाई, करीम रहिमोद्दीन हलवाई सर्व रा.घोडापीर मोहल्ला यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई यांनी दिली. अंगणात वाहन लावण्याच्या वादातूनच जमावाने अचानक हल्ला करून मारहाण केली. त्यात सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई, फारूखशेख हलवाई, साजिद हलवाई, शाहबुद्दीन हलवाई, रफियोद्दीन हलवाई, साबीरा बी हलवाई सर्व रा.घोडापीर मोहल्ला हे जखमी   झाले. याबाबत सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई यांनी फिर्याद दिल्याने तला जाकीर कुरेशी, तन्वीर सलीम कुरेशी, हमजा सलीम कुरेशी, मुस्तकीन सलीम कुरेशी, मज्जू शेख कुरेशी, जुबेर सलीम कुरेशी सर्व रा.घोडापीर मोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजू रफियोद्दीन हलवाई, हमजा सलिम कुरेशी, तल्हा जाकीर हुसेन कुरेशी, मुस्तकीन शेख कुरेशी यांना अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक इनामदार करीत आहेत.